भारतीय वंशाच्या उमेदवाराने मैदान मारले, कोण आहेत पिया डांडिया? मुख्यध्यापिका ते...
अमेरिकेच्या राजकारणात पिया डांडियांची एंट्री. भारतीय वंशाच्या पिया डांडिया यांचा विजय झाला आहे.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिनिधीगृहाच्या निकालात ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. 27 पैकी 16 जागांवर डेमोक्रॅट्सचे उमेदवार विजयी झाले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिक्स पक्षाला 104 जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय वंशाच्या पिया डांडिया यांचाही विजय झाला आहे. कोण आहेत पिया डांडिया? जाणून घेऊयात.
राजस्थानची राजधानी जयपूर येथून अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिक आहेत. पिया डांडिया यांनी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत बाजी मारली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या डांडिया यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी सैनिक कैसी अस्कर यांचा पराभव केला. या विजयामुळे, त्या प्रमिला जयपाल यांच्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात (US House of Representatives) निवडून आलेल्या दुसऱ्या भारतीय-अमेरिकन महिला ठरल्या आहेत. ह
हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या पिया यांनी दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमधील मुलांना इंग्रजी शिकवले आहे. त्यांनी शिक्षिका, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्हाईट हाऊस फेलो म्हणूनही काम केले आहे. पिया डांडिया यांना 51.9 टक्के म्हणजेच 1 लाख 51 हजार 926 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी कैसी अस्कर यांना 49.1 टक्के म्हणजेच 1 लाख 40 हजार 933 मते मिळाली.
पिया यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. पिया यांचा जन्मदेखील फ्लोरिडातील पाम बीच काउंटी येथे झाला. त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी मिडल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर कमी वयातच हायस्कुलच्या मुख्यध्यापिका म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. यासोबतच त्या अॅपलसारख्या मोठ्या कंपनीतही कार्यरत होत्या.
अमेरिकेच्या मध्यावथी निवडणुकीत पिया डांडिया यांच्यासह अनेक भारतीय वंशाचे उमेदवार आहेत. विवेक रामास्वामी हे ओहायोमधून गव्हर्नरपदासाठी मैदानात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे अमीश शाह प्रतिनिधी सभेसाठी अॅरिझोनमधून निवडणूक लढवत आहेत.
सुहास सुब्रमण्यम यांचा विजय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत त्यांनी प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. सुहास यांनी 61.5 टक्क्याहून अधिक मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डेव्ह बेकविथ यांचा पराभव केला.