पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पायल झांबरेनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी पायलचा पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आले होती. तर, पोलिसांनी आता तपासाचा वेग वाढवत पायलच्या सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
अरविंद झांबरे (सासरे) आणि मंगल झांबरे (सासू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज दोघांना पोलीस न्यायालयात हजर करण्यात आले. शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पायल झांबरेच्या नंदेला अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पायल झांबरेने आत्महत्या करण्याआधी तिच्या भावाला मेसेज केला होता. तेव्हा तिने थेट सासूचे नाव घेण्यात आले होते. मृत्यूपूर्वी तिने भावाला माझी सासू जबाबदार आहे, असा मेसेज केला होता. या घटनेनंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सासू-सासरे आणि नणंद फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढत सासरा अरविंद झांबरे आणि मंगल झांबरे यांनाही ताब्यात घेतलं आहे. तसंच, तक्रारीत पायलची नणंद हिचेही नाव आहे. पायलची नणंद हिनेही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अद्याप पोलिसांनी पायलच्या नणंदेला ताब्यात घेतलं नसून शोध सुरू आहे.
हुंड्यासाठी छळ केल्याने पायल अक्षय झांबरे (वय 34) हिने 2 नोव्हेंबर रोजी मुकुंदनगर भागातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे (वय 58), सासरे अरविंद झांबरे (वय 65) आणि नणंद अक्षता झांबरे-निमन (वय 30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पायलचा भाऊ ऋषिकेश पवार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल आणि अक्षय यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी पायलचा छळ सुरू केला. माहेरून पैसे, सोने आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावण्यात आला. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्याने पायलने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.