• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना FDAचा दणका! 3193 किलो मोतीचूर लाडू, बुंदी व बर्फीमध्ये भेसळ

दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना FDAचा दणका! 3193 किलो मोतीचूर लाडू, बुंदी व बर्फीमध्ये भेसळ

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विभागाने पाच जिल्ह्यांत मिठाई विक्रेत्यांना दणका दिला आहे. 1,491 किलो मिठाईचा साठा नष्ट केला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 04, 2026, 02:22 PM IST|Updated: Nov 04, 2026, 02:26 PM IST
joinshare
दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना FDAचा दणका! 3193 किलो मोतीचूर लाडू, बुंदी व बर्फीमध्ये भेसळ
Image Credit: pune fda

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

2

5 जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, शस्त्र हिसकावताना झटापट अन्....

3

मुंबईकरांनो, 'या' भागात फटाके फोडाल तर दिवाळी जाईल तुरुंगात; 2 डिसेंबरपर्यंत आदेश लागू!

4

सर्वात मोठ्या IT कंपनीत नोकरकपात, पण तरीही कर्मचाऱ्यांची चांदी; फ्री मॅकबुक, अन् एक वर्षासाठी...

5

₹5.47 कोटी मिळणार... मुंबईतला गॅरेजवाला कोर्टाच्या एका निर्णयाने झाला करोडपती; नेमकं प्रकरण काय?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी म्हटलं की, मिठाई विक्रेत्यांची चांदीच चांदी असते. सगळ्यात जास्त मिठाईचा खप दिवाळीच्या दिवसांमध्ये होते. त्यामुळ दुकानदार मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करतात. पण दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाची धुरी आयुक्त तुकाराम मुंडेंकडे आली आहे. त्यांनी  ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत राज्यात कारवाईचा धडका लावला आहे.

कुठे झाली कारवाई?

अशातच दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विभागाने पाच जिल्ह्यांत मिठाई विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि फरसाण विक्रेत्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई सापडली आहे.

कुठल्या जिल्ह्यांमध्ये कारवाई?

या कारवाई अतर्गंत पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये 15 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण 3 हजार 193 किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर या जप्त साठ्याची अंदाजे किंमत 16 लाख 93 हजार 295 रुपये इतकी आहे.

1 हजार 440 किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट

तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जप्त केलेल्या मिठाईपैकी 1 हजार 440 किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट केला आहे. तर नष्ट केलेल्या खाद्यपदार्थांची किंमत 4 लाख 35 हजार 200 रुपये एवढी होती. तर या कारवाई दरम्यान 8 आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तर 3 अन्न आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील कराची स्वीट मार्ट, शिक्रापूरमधील श्री गणेश लाडूवाले, मंचरमधील राजमिलन स्वीट्सवर कारवाई करण्यात आली आहे.  पुण्यातील बिकानेर मिठाईवाल्यांकडील 268 किलो बर्फी जप्त करून नष्ट केली आहे. तर सांगलीतील आशिष ट्रेडर्सकडून 749 किलो बदामांचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या साठ्याची किंमत 8 लाख 98 हजार 800 रुपये एवढी सांगण्यात येत आहे.  निकृष्ट दर्जा, अयोग्य साठवणूक, अस्वच्छता आणि लेबलिंगमधील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईनंतर अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन FDA कडून व्यावसायिकांना करण्यात आले आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Breaking News