• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /खासदार श्याम कुमार बर्वे यांनी गालावर चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

खासदार श्याम कुमार बर्वे यांनी गालावर चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे हे महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांना गालावर चापट मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 04, 2026, 12:31 PM IST|Updated: Nov 04, 2026, 12:42 PM IST
joinshare
खासदार श्याम कुमार बर्वे यांनी गालावर चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Image Credit: काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे हे महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांना गालावर चापट मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पायल झांबरे प्रकरणात मोठी अपडेट; सासू-सासऱ्यांना अटक, तर, नणंद...

पायल झांबरे प्रकरणात मोठी अपडेट; सासू-सासऱ्यांना अटक, तर, नणंद...

2

महाराष्ट्रातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

3

बॉलिवूडमध्ये खळबळ! तुषार कपूरनंतर आता आयुष्मान खुरानाला धमकीचा मेसेज, लॉरेन्स गँगचा उल्लेख

4

खासदार श्याम कुमार बर्वे यांनी गालावर चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

5

धनत्रयोदशीच्या आधीच सोनं झालं स्वस्त; वाचा 22, 24 आणि 18 कॅरेटचे दर, चांदीचाही भाव कोसळला

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काँग्रेसच्या खासदारांचा एक व्हिडीओ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिजीओत काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांना गालावर चापट मारताना दिसत आहेत. काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनादरम्यान हा कथित प्रकार घडला होता. सर्व खासदार बसमधून जात असतानाच श्याम कुमार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर यांना चापट मारली होती. यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता प्रतिभा धानोकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

दिल्लीमधील आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या खासदारांना बसमधून आंदोलनस्थळापासून दूर नेण्यात आलं. बसमधून जात असताना महिला खासदार एका बाजूला बसलेल्या असून घोषणा देताना दिसत आहेत. यावेळी श्याम कुमार बर्वे हे प्रतिभा धानोकर यांच्या बाजूला उभे आहेत. यावेळी प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यात संवाद सुरु असताना ते गालावर चापट मारतात. यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आश्चर्याचे आहेत. वर्षा गायकवाड त्यांच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत.

हे ही वाचा - काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण

प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया

प्रतिभा धानोरकर यांनी आमच्यात थट्टा मस्करी सुरु असते असं म्हटलं आहे. तक्रार केली असेल तर त्यात तथ्य नाही असेही त्या म्हणाल्या आहेत. आम्ही भावा बहिणीसारखे राहतो असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Pratibha Dhanorkar Viral Video | प्रतिभा धानोरकरांना श्यामकुमार बर्वेंनी चापट मारल्याचा VIDEO व्हायरल https://t.co/YkjainGUEI < येथे जाणून घ्या सविस्तर माहिती... #Congress #VoteBachaoDeshBachao #Andolan #Video #Shamkumarbarve #pratibhadhanorkar #complaint काँग्रेसच्या दिल्लीतील आंदोलनातील व्हिडिओ व्हायरल खा. श्याम कुमार बर्वे यांनी खा. प्रतिभा धानोरकर यांना चापट मारल्याचा व्हिडिओ व्हायरल सदर प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती.

— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 4, 2026


"तक्रार करणारा माणूस कोण आहे, त्याचं नाव आहे का? आणि जर माझ्यासोबत असं काही झालं असतं तर स्वत: प्रतिभा धानोरकर नावाने तक्रार जायला पाहिजे होती. मग तक्रार नसताना निवावी तक्रार करत माझे, श्याम बर्वे आणि वर्षा गायकवाड यांचे विरोधक करत असतील तर त्यात किती तथ्य आहे हे पाहायला पाहिजे. कोणी कोणाचीही तक्रार करतं म्हणून त्यावर कारवाई होईल का? यात कोणतंही तथ्य नाही," असं त्या म्हणाल्या आहेत.

"आम्ही सर्वजण भावा बहिणीसारखे एकत्रित मिळून राहतो. मस्करी करत असताना तसं केलं आहे. मग त्याचा इतका मोठा विषय करुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे तो चुकीचा आहे. असा कोणताही प्रकार झालेला नाही," असा दावा त्यांनी केला आहे.

श्याम कुमार बर्वे यांनीही दिलं स्पष्टीकरण

श्याम कुमार बर्वे यांनी स्पष्टीकरण देताना प्रतिभा धानोरकर आपल्या लहान बहिणीसारख्या असल्याचं म्हटलं आहे. "मी जी चापट मारली ती छोटी बहिणीसारख्या असणाऱ्या प्रतिभा धानोरकरांना मारली आहे. आम्ही अडीच वर्षांपासून प्रत्येक आंदोलनाक एकत्र असतो. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना घोषणा द्या म्हणून गमतीत चापट मारत आहे. पण तेवढंच कापून विरोधकांनी दाखवलं आहे. कोणीतरी तक्रार केली आहे, त्यात नावदेखील घेतले नाही. 
बनावट ईमेल आहे," असं त्यांनी सांगितलं आहे. मी याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सांगितले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
congress