सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 202 रुपयांनी घसरून 139250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याच्या दरात झालेल्या या मोठ्या उलटफेरमुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉलर वधारल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती याबरोबरच अमेरिकी बॉन्ड यील्ड याचा परिणाम झाल्यामुळं जागतिक बाजार स्थिर आहे. त्यामुळं त्याचा परिणाम मौल्यवान धातुच्या किंमतीवर होतोय. कच्चा तेलाच्या किंमती मंगळवारी घसरून 2 टक्क्यांवर पोहोचल्या होत्या. हा मागील तीन आठवड्यातील सर्वाच निच्चांकी स्तर होता. बाजारातील गुंतवणुकदार सध्या यक्रेन आणि इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर नजर ठेवून आहेत.
दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. बाजारातील या स्थितीमुळं तेलाच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसंच, डॉलरचा भाव वधारल्याने आणि अमेरिका बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होताना दिसत आहे.
धनत्रयोदशी 6 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येत आहे. या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. भारतात अनेकजण यात गुंतवणुक करतात. सोनं आणि चांदीच्या दरात होणारी घसरणीमुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे दर 202 रुपयांनी घसरून 139250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीदेखील 1889 रुपयांनी घसरून 177811 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करतेय. कॉमेक्सवर चांदीचा दर 0.98 टक्क्यांनी घसरून 49 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करतेय.
24 कॅरेटः 13,965 प्रति ग्रॅम
22 कॅरेटः 12,801 प्रति ग्रॅम
18 कॅरेटः 10,474 प्रति ग्रॅम