SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बाजारासारखी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की घरच्या घरी कशी बनवायची?

काही सोप्या टिप्स आणि योग्य पद्धतीच्या मदतीने, तुम्ही घरीच पातळ, कुरकुरीत आणि चवदार शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता. चला, याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 22, 2026, 18:59 IST | Updated: Nov 22, 2026, 19:07 IST
Join

दुकानामध्ये मिळणारे शेंगदाण्याची चिक्की अनेकांना खायला आवडते. बऱ्याचदा ही चिक्की चहाबरोबर किंवा परिवारासोबत वेळ घालवत असताना चिक्की खाल्ल्याने हिवाळ्याचा आनंद आणखी जास्त होतो. बाजारामध्ये मिळणारी चिक्की ही अनेक महिने साठवून ठेवलेली असते. त्याचबरोबर ती चिक्की खराब आहे की नाही यासंदर्भात चिंता अनेकदा आपल्याला होत असते. जर तुम्हाला घरच्या घरी शेंगदाण्याची चिक्की कमी साहित्यामध्ये घरी तयार करायची असेल तर तुमच्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल. काही सोप्या टिप्स आणि योग्य पद्धतीच्या मदतीने, तुम्ही घरीच पातळ, कुरकुरीत आणि चवदार शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता. चला, याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप भाजलेले शेंगदाणे
1 कप किसलेला किंवा बारीक चिरलेला गूळ
1 चमचा साजूक तूप
चिमूटभर वेलची पूड

जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये शेंगदाण्याची चिक्की बनवायची असेल तर मग घटकांमध्ये प्रमाण वाढवावे लागेल.

कशी बनवायची शेंगदाण्याची चिक्की?

शेंगदाण्याची चिक्की तयार करण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे चांगले भाजून घ्या, शेंगदाणे चांगले भाजणे गरजेचे आहे त्यामुळे चिक्कीची चव आणखी वाढते. त्यानंतर शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढा म्हणजेच ते तुमच्या तोंडात खाताना येणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही त्या शेंगदाण्यांना वाटून देखील घेऊ शकता. आता एका पातेल्यात थोडे साजूक तूप घालून त्यात किसलेला गूळ टाका आणि मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ विरघळल्यानंतर, पाक काही मिनिटे शिजवा आणि गूळ भांड्याला चिकटू नये किंवा जळू नये म्हणून सतत ढवळत राहा.

जेव्हा पाक तयार होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि आता त्यात भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घालून पटकन चांगले मिसळा. यानंतर, एका ताटावर, लाटण्याच्या फळीवर किंवा स्वयंपाकघरातील स्वच्छ पृष्ठभागावर थोडे तूप लावा आणि त्यावर लगेच तयार केलेले मिश्रण ओता. मिश्रण थोडे गरम असतानाच, तेल लावलेल्या लाटण्याने ते पातळ लाटा. लक्षात ठेवा की थंड झाल्यावर चिक्की लाटायला अवघड जाऊ शकते. आता चाकू किंवा कटरच्या मदतीने ते तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या. ग्राइंडर पूर्णपणे थंड झाल्यावर, कापलेले तुकडे वेगळे करा आणि नंतर त्याच्या चवीचा आनंद घ्या.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES