दिवाळीत गोडवा कायम ठेवण्यासाठी घरी बनवा बाजारासारखे स्पॉंजी रसगुल्ले
दिवाळीमध्ये गोडवा वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा खास रसगुल्ले, जर तुम्हालाही बंगाली रसगुल्ले घरी बनवायचे असतील, तर लेख सविस्तर वाचा.
दिवाळी येणार आहे आणि अशा रोषणाईच्या या सणाच्या वेळी काहीतरी तोंड गोड करण्यासाठी विशेष रेसिपी या लेखामध्ये सांगणार आहोत. आजच्या लेखामध्ये तुम्हाला आम्ही बंगाली रसगुल्ले कसे तयार करायचे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मिठाईच्या दुकानामध्ये दोन प्रकारचे रसगुल्ले मिळतात, पहिले म्हणजेच जे घट्ट असतात आणि दुसरे म्हणजेच जे मोठे असतात. जे मोठे वाले रसगुल्ले असतात ते सहसा दाबून खाल्ले जातात आणि त्यांचा गोल आकार टिकून राहतो. त्यांची चवही अप्रतिम असते, म्हणूनच ते पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. जर तुम्हालाही बंगाली रसगुल्ले घरी बनवायचे असतील, तर तुमच्यासाठी हा लेख आहे.
बंगाली रसगुल्ला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
फुल क्रीम दूध – 2 लिटर
लिंबाचा रस – 2 चमचे
साखर – एक कप
पाणी – 5 कप
वेलची – 3
हे ही वाचा
दिवाळीला बाजारातील मिठाई विसरा, 3 पदार्थांत तयार करा स्वादिष्ट दूध पेडा
बंगाली रसगुल्ला कसा तयार करायचा
बंगाली रसगुल्ला तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये दूध उकळायला ठेवा आणि ते चमच्याने अधूनमधून ढवळत रहा. दूध उकळायला आल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून ढवळा, बाचा रस उपलब्ध नसल्यास, तुम्ही थोडे दही किंवा व्हिनेगर घालू शकता यामुळे दूध फाटून छेना तयार होईल. दूध नासेपर्यंत गॅस मंद आणि मध्यम आचेवर ठेवा आणि दूध नासल्यावर गॅस बंद करा. आता लिंबाचा आंबटपणा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी छेना वाहत्या पाण्याखाली धुवा. त्यानंतर, त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी छेना पिळून घ्या आणि 1 तासासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर 1 तासानंतर तयार केलेले पनीर मॅश करा आणि यामुळे पनीरचा पोत मऊ होईल.
रसगुल्ल्याचा पाक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि एक कप साखर आणि तीन वेलची घालून उकळी आणा. साखर विरघळेपर्यंत पाणी ढवळा, पाक शिजत असताना, पनीरचे गोल गोळे बनवा. पाक तयार झाल्यानंतर पनीरचे गोळे एक एक पाकामध्ये बुडवा, सर्व गोळे पाकात घातल्यावर, पातेल्यावर झाकण ठेवा आणि पनीरचे गोळे पाण्यात 10 मिनिटे शिजू द्या. हे गोळे आकाराने दुप्पट होतील आणि त्यांचे रसगुल्ले तयार होतील.