अनेकदा संध्याकाळी काही तरी वेगळे खायची इच्छा झाली किंवा सणाला अनेक पाहुणे घरी येतात. यावेळी वेगळे काही तरी काय तयार करायचे हे पटकण सुचत नाही. बऱ्याचदा तीच शेवयाची खीर असो किंवा तेच बोरिंग पोहे खाऊन कंटाळला असाल तर आज या लेखामध्ये तुम्हाला एक खास पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. आजच्या या लेखामध्ये कमी साहित्यामध्ये गुळाची खीर कशी तयार करायची यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
दूध, तांदूळ आणि गूळ यांपासून बनवलेली ही खीर स्वादिष्ट आणि बनवायला सोपी असते. जर तुम्हाला या सणांना स्वतः गुळाची खीर बनवायची असेल, पण तुम्ही ती यापूर्वी कधी बनवली नसेल, तर आम्ही या लेखात एक सोपी रेसिपी सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही या भव्य सणासाठी ती बनवू शकता.
तांदूळ – 1 कप (लहान दाण्याचा)
दूध – 2 लिटर
किसलेला गूळ - 100 ग्रॅम
काजू – 10-12 (चिरलेले)
बदाम – 10-12 (बारीक चिरलेले)
वेलची – 2-3 (जाडसर वाटलेली)
गुळाची खीर तयार करण्यासाठी सर्वात आधी दोन ते तीन वेळा 1 कप घेतलेले तांदूळ चांगली धुवून घ्या. त्यानंतर ते तांदूळ 30 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता, एका जाड बुडाच्या भांड्यात 2 लिटर दूध घालून ते गॅसवर ठेवून चांगले उकळवा. त्यानंतर उकळलेल्या दुधामध्ये भिजवलेल्या तांदळातले पाणी काढून उकळत्या दुधात घाला. भिजवलेले तांदूळ दूधामध्ये टाकल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवणे गरजेचे आहे आणि यावेळी खीर सतत ढवळत शिजवा, जेणेकरून मिश्रण तळाला चिकटणार नाही.
हे ही वाचा
जेव्हा तांदूळ दूधामध्ये चांगले शिजतील आणि सुमारे 20 मिनिटानंतर जेव्हा दूध घट्ट होऊ लागले की त्यामध्ये कापलेले काजू आणि बदाम घाला. त्याचबरोबर वाटलेली जाडसर वेलची घालून चांगले मिसळून घ्या. जेव्हा भात पूर्णपणे शिजेल त्यानंतर खीर घट्ट होईल आणि गॅस बद करा. खीर तयार झाल्यानंतर खीर 15-20 मिनिटे हलकी थंड होऊ द्या. आता त्यामध्ये किसलेला गूळ त्यामध्ये घाला आणि ते चांगले मिसळून घ्या, त्यानंतर तुमची गुळाची खीर तयार होईल.