वॅक्सिंग, शेविंग की अजून काही.... काखेतील केसं काढण्यासाठी कोणती पद्धत योग्य?
Underarm Hair Removal : अंडरआर्म्समधील केस काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र जर येथील केस योग्य प्रकारे काढले गेले नाहीत तर येथील त्वचा नाजूक असल्याने तिला इजा होण्याची शक्यता असते. तेव्हा अंडरआर्म्समधील केस काढण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी जाणून घेऊयात.
Skin Care Tips : अंडरआर्म्स म्हणेजच काखेतील केसं काढणं हा पर्सनल ग्रूमिंगचा भाग आहे. इथे घाम सुद्धा खूप जास्त येतो. ज्यामुळे घामाची समस्या सुद्धा होऊ शकते. खास करून उन्हाळ्यात अंडरआर्म्समध्ये जास्त केस वाढले की वाटू लागतं. अंडरआर्म्समधील केस काढून टाकण्यासाठी अनेक पद्धती आहेत. अंडरआर्म्स जवळील त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते, म्हणूनच तेथील केसं जर चुकीच्या पद्धतीने काढले तर रेडनेस, खाज, जळजळ, काळवंडणे अशा समस्या होतात. जर तुम्हालाही काखेतील केस काढण्याच्या पद्धतीबाबत संभ्रम असेल, तर तज्ज्ञांचे यावर काय म्हणणे आहे याविषयी जाणून घेऊयात.
हेअर रिमूव्हल क्रीम वापरावी की नाही?
वेदनामुक्तरीत्या केस काढण्यासाठी 'हेअर रिमूव्हल क्रीम' हा एक चांगला आणि परवडणारा पर्याय वाटतो. मात्र संवेदनशील त्वचेसाठी ते अजिबात योग्य नाही.
तज्ज्ञांच्या मते यामुळे काखेतील संवेदनशील त्वचेची जळजळ होऊ शकते आणि हायपरपिग्मेंटेशनचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. 'पॅच टेस्ट' केल्यानंतर यांचा वापर क्वचित प्रसंगी केला जाऊ शकतो, परंतु त्यांचा दीर्घकाळ वापर करणे टाळले पाहिजे.
वॅक्सिंग करणं किती योग्य?
वारंवार केस काढण्याच्या कटकटीपासून वाचायचे असेल, तर वॅक्सिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे केस मुळापासून निघत असल्याने, तुम्हाला बराच काळ शेव्हिंग करण्याची गरज पडत नाही. मात्र काखेतील त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे येथील वॅक्सिंग हे चांगल्या ठिकाणावरून किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावे. त्वचा भाजू नये यासाठी वॅक्सचे तापमान योग्य असल्याची खात्री करा.
शेविंग करून केसं काढावीत :
केस काढण्याच्या सर्वात सोप्या पद्धतींपैकी 'शेव्हिंग' ही एक पद्धत आहे. यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि हे घरीच सहजपणे करता येते. मात्र चुकीच्या पद्धतीने दाढी केल्याने जखमा, त्वचेची जळजळ आणि केस त्वचेत वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून स्वच्छ, धारदार रेझर वापरा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने हळुवारपणे दाढी करा. जास्त दाब देणे टाळा.