• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /बीडच्या कपिलधार कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट, 25 वर्षांत भाविकांवर आली स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ

बीडच्या कपिलधार कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट, 25 वर्षांत भाविकांवर आली स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ

बीडच्या श्रीक्षेत्र कपिलधार येथील प्रसिद्ध कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट पसरलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 22, 2026, 20:51 IST|Updated: Nov 23, 2026, 07:56 IST
joinshare
बीडच्या कपिलधार कार्तिक पौर्णिमा यात्रेवर यंदा भीषण दुष्काळाचं सावट, 25 वर्षांत  भाविकांवर आली स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ
Image Credit: Beed Kapildhar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
उल्हासनगरमधील जमिनींसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! सिंधी समाजाला दिलासा; म्हणाले, 'नागपूरमधून...'

उल्हासनगरमधील जमिनींसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! सिंधी समाजाला दिलासा; म्हणाले, 'नागपूरमधून...'

2

कुठे पाऊस, कुठे दाट धुके? नोव्हेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील वारं फिरलं, कसं असेल आजचं हवामान?

3

गांधी विरुद्ध ट्रम्प... ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारवर निशाणा! 'मोदींनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी...', 'अंधभक्तांना आनंदाचे...'

4

आजचे राशीभविष्य 23 नोव्हेंबर 2026 : आज वैकुंठ चतुदर्शीला मालव्य राजयोग! मेषसह या राशींना फायदाच फायदा, तर या लोकांना राहावं सतर्क

5

शतक ठोकलं पण सामना गमावला, पाकिस्तानविरुद्ध भारताचा 48 धावांनी पराभव!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक इथे दाखल होतात. मात्र, तीव्र पाणीटंचाईमुळे यंदा 'दर्शनानंतर परतीचा प्रवास करा, मुक्काम टाळा', असं आवाहन देवस्थान ट्रस्टने केलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच इथला प्रसिद्ध धबधबा कोरडा पडल्याने भाविकांवर स्नानाविना दर्शन घेण्याची वेळ आलीय.

चारही बाजूंनी डोंगरकपारीत वसलेलं हे आहे बीडपासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र कपिलधार. इसवी सन 1631 मध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी याच ठिकाणी जिवंत संजीवन समाधी घेतली. गेल्या साडेचारशे वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून लाखो भाविक या पवित्र भूमीत दाखल होतात. मात्र, यंदा या तीर्थक्षेत्राला भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. धबधबा कोरडा पडल्याने पाण्याअभावी भाविकांनी मुक्काम न करता केवळ दर्शन घेऊन परतावं, असं हतबल आवाहन देवस्थान ट्रस्टला करावं लागलं आहे.

तुळशी विवाहाच्या दिवसापासून इथे महापूजेला सुरुवात होते आणि यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. कपिलधारच्या पवित्र धबधब्यात स्नान करूनच मन्मथ स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची साडेचारशे वर्षांची अखंड परंपरा आहे. मात्र, गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच हा धबधबा पूर्णपणे कोरडा पडल्याने या विधिवत परंपरेत मोठा खंड पडला आहे.

एरवी नोव्हेंबर महिन्यात खळखळणारा हा धबधबा आज कोरडाठाक पडला आहे. भाविकांची आस्था जपण्यासाठी मंदिर प्रशासनाने एका पाईपद्वारे कुंडात पाणी सोडून कृत्रिम धबधबा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. स्नानाऐवजी केवळ पाण्याचा स्पर्श करून दर्शन घेण्याची वेळ भक्तांवर आली आहे. इतकंच नाही, तर कुंडात सोडलेलं पाणी स्वच्छ नसल्याचा आरोपही भाविकांनी केला आहे. प्रशासनाने यात्रेचं गांभीर्य ओळखून तातडीने स्वच्छ पाण्याची सोय करावी, अशी आर्त मागणी भक्तांकडून होत आहे.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून अनेक भाविक इथे मुक्कामासाठी येतात. इथल्या पवित्र जलात स्नान केल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यंदा कुंडातील साचलेलंच पाणी पुन्हा उपसा करून वरून सोडलं जात असल्याने भाविक कमालीचे नाराज आहेत. अस्वच्छ पाण्यामुळे धार्मिक आस्थेला धक्का बसत असल्याची भावना भक्तांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

साडेचारशे वर्षांची श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या कपिलधार यात्रेवर यंदा दुष्काळाचं गडद सावट आहे. भक्तांच्या मनात भक्तीचा उत्साह कायम असला, तरी पाण्याअभावी धार्मिक विधींवर मर्यादा आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. भक्तीच्या या वाटेवर दुष्काळाचं संकट नको, तर श्रद्धेला प्रशासनाच्या सुविधांची साथ मिळावी, हीच अपेक्षा राज्यातून आलेले लाखो भाविक व्यक्त करत आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Festivals
Beed