Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 23 November 2026 in Marathi : पंचांगानुसार आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीचा योग जुळून आला आहे. पंचांगानुसार आज मालव्य राजयोगासह वरियान योग, परिजात योग, वाशि योग, आनन्दादि योग, सुनफा योग असणार आहे. आज महादेव आणि विष्णुची एकत्र पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आर्थिक समस्येवर उपाय सापडणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. नात्यामध्ये संवाद महत्त्वाचा असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी जरा कठीण असणार आहे. काही कामांमध्ये अडथळे येणार आहे. अतिविचारामुळे काहीसा गोंधळ उडणार आहे. जीवनशैली आणि सौंदर्य उत्पादकांवर खर्च होणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवश थोडा त्रासदायक असणार आहे. चुकीच्या निर्णयांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीसा प्रयत्न करावा लागणार आहे. आज तुमचे पैसे उगाचच वाया जाणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी यश घेऊन आला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे. सामाजिक संबंध अधिक दृढ होणार आहे. पैशांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडणार आहे. संवादातून अनेक कामं मार्गी लागणार आहे. वरिष्ठांवर तुमचा प्रभाव पडणार आहे. नात्यात गोडवा असणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस कामासाठी कठीण असणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडं टेन्शन राहणार आहे. किरकोळ चुकाही आज तुम्हाला महागात पडतील. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल असणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवश विशेष फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. पैसे बचतीवर भर द्या.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस तुम्हाला सावध राहायचं आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा आजचा दिवस असणार आहे. आर्थिक लाभाचेही संकेत आहेत.
धनु (Sagittarius Zodiac)
आज तुमच्या वाणीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तर बँक बॅलेन्स वाढीसाठी मार्ग सापडणार आहे. व्यावसायिकांनी गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देणे गरजे आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुमच्या योजनेसाठी विशेष परिश्रम करावे लागणार आहे. आर्थिक बाबीमध्ये विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल असणार आहे. तुमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळणार आहे. कामातून चांगला नफा मिळणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कागदपत्रांची कामं मार्गी लागणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. एका छोट्या सहलीमुळेही सकारात्मक वाटणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)