SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात जमीन व्यवहारांबाबत बदलला नियम;सरकारला द्यावी लागणार माहिती;तुमच्यावर काय परिणाम?

महाराष्ट्रात जमीन व्यवहारातील दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रकमेची माहिती आयकर विभागाला पाठवली जाणार. i-Sarita प्रणालीतील बदल झाला असून एसएफटी अहवाल आणि आयकर कायद्यातील नियम जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 21, 2026, 08:16 IST | Updated: Nov 21, 2026, 08:28 IST
Image Credit: जमीन खरेदी (फोटो सौजन्य-गुगल)
Join

जमीनीत आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरते. कारण जमिनीचे दर वाढत असतात. त्यामुळे अनेकजण जमीन गुंतवणूक करताना दिसतात. पण जमीन व्यवहारांवर आता सरकारची नजर असणार आहे. महाराष्ट्रात जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललंय. यापुढे मालमत्तेच्या दस्तनोंदणीवेळी रोख रक्कम आणि चेकद्वारे दिलेल्या रकमेची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रकमेचा समावेश असलेल्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला पाठवली जाणार आहे. काय घडलंय नेमकं? याचा जमीन व्यवहारावेळी तुमच्यावर काय होणार परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.

 

दर महिन्याला अहवाल

राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांना मालमत्ता व्यवहारांची माहिती संकलित करून दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत आयकर विभागाकडे पाठवावी लागणार आहे. यासाठी ‘स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स’ म्हणजेच एसएफटी हा अहवाल वापरला जाणार आहे. या अहवालात खरेदीदार आणि विक्रेत्यांची नावे, पॅन क्रमांक, व्यवहाराची एकूण किंमत, रोख रकमेचा हिस्सा, दस्त क्रमांक आणि नोंदणीची तारीख यांसारखी माहिती समाविष्ट असेल. त्यामुळे नोंदणी कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती थेट कर विभागापर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे.

एकापेक्षा जास्त खरेदीदार किंवा विक्रेते असतील तर...

अनेकदा एका मालमत्तेच्या व्यवहारात एकापेक्षा जास्त खरेदीदार किंवा विक्रेते सहभागी असतात. अशा वेळी नेमकी किती रक्कम कोणत्या व्यक्तीने दिली आणि कोणाला मिळाली, याची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ‘आय-सरिता’ (i-Sarita) सिस्टिममध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. दस्तनोंदणीच्या वेळीच रोख आणि चेकद्वारे झालेल्या व्यवहारांची माहिती स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे.

आयकर कायदा काय सांगतो?

दोन लाख रुपयांच्या रोख व्यवहारांबाबतची मर्यादा केवळ राज्य सरकारने नव्याने लागू केलेली नाही. 1 एप्रिल 2026 पासून लागू असलेल्या आयकर कायदा, 2025 मधील कलम 186 नुसार, एका व्यक्तीकडून एका दिवसात एकूण दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम, एकाच व्यवहारासाठी किंवा एकाच प्रसंगाशी संबंधित व्यवहारांसाठी रोख स्वरूपात स्वीकारण्यावर निर्बंध आहेत. अशा रकमेचा स्वीकार खातेदाराचा चेक, बँक ड्राफ्ट किंवा निर्धारित इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे आवश्यक असणार आहे.

काय काळजी घ्यावी?

या व्यवस्थेमुळे मालमत्तेच्या व्यवहारातील आर्थिक तपशील अधिक काटेकोरपणे तपासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांनी व्यवहाराची रक्कम, पैसे देण्याची पद्धत आणि पॅनसह आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूक द्यावी. रोख व्यवहार टाळून बँकिंग किंवा डिजिटल माध्यमातून पैसे देणे अधिक सुरक्षित होणार आहे. विशेषतः मोठ्या व्यवहारांमध्ये करविषयक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांमध्ये ही व्यवस्था लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मालमत्ता व्यवहारांतील आर्थिक पारदर्शकता वाढवण्यास मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES