SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाजपच्या प्रस्तावाला काँग्रेसचा पाठिंबा; दादर नामांतरावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं; 'फडणवीसांनी तात्काळ...'

दादरच्या चैत्यभूमी नामकरणावरून वाद सुरु झालाय. भाजपच्या प्रस्तावाला मनसे दोन्ही शिवसेनांनी विरोध केलाय. तर काँग्रेसने मात्र याउलट भूमिका घेतलीय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 19, 2026, 12:31 IST | Updated: Nov 19, 2026, 13:40 IST
Image Credit: दादर नामांतर
Join

दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. दादर स्थानकाला  'चैत्यभूमी' असं नवीन नाव असणार आहे. विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर मनसे, शिवसेना तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध होतोय. असे असताना काँग्रेसने याविरोधी भूमिका घेतली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊयाय

कुठून झाली सुरुवात?

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारनं यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इथून दादर रेल्वेस्थानक नामांतरणाच्या चर्चांना सुरुवात झाली.


चैत्यभूमी नाव देण्याची मागणी नेमकी का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरमधील ‘राजगृह’ हे निवासस्थान आणि त्यांचे स्मृतिस्थळ असलेली चैत्यभूमी यामुळे या परिसराला आंबेडकरी चळवळीत विशेष महत्त्व आहे. चैत्यभूमीला अभिवादनासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्यामुळे दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायांकडून केली जात आहे.

मनसेचा विरोध कायम 

दादर रेल्वे स्टेशनच्या नामकरणावरून आता वाद सुरू झालाय. या नामकरणाला दादरकरांचा विरोध असल्याचं म्हणत याबाबत दादरकरांना विचारात घेतलं नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. दादरमधील नागरिकांना हे नामांतर मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय. सरकारने स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी स्थानिक रहिवाशांशी चर्चा करावी आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. दादरची ओळख आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असा त्यांच्या भूमिकेचा आशय आहे.

राज ठाकरेंची काय होती भूमिका?

दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा यापूर्वी 2011 मध्येही चर्चेत आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर स्थानकाचे नाव बदलण्यास विरोध केला होता. केवळ नाव बदलल्याने कोणते प्रश्न सुटणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नाव बदलण्याच्या राजकारणाला आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

 

शिवसेनेचा विरोध 

दादरच्या नामकरणाला आता महायुतीतूनच विरोध झालेला पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनी दादर नामांकरणासंदर्भात विरोधाची भाषा वापरली. नामांतराआडून मराठी माणसांत संघर्ष घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप  शिशिर शिंदे यांनी भाजपवर केलाय. दादरचे नाव बदलण्याचा घाट हाणून पाडू, असेही शिशिर शिंदे म्हणाले.  


काय म्हणाले हर्षवर्धन सकपाळ?

दादर नामांतर मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावर हरकत घेण्याचा विषय नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. तसेच ते अनंतात विलीन झाले ती दादरची स्मशानभूमी जिला आपण चैत्यभूमी म्हणतो. दादरला चैत्यभूमीचा उल्लेख होत होता. मात्र राज्य सरकारने हा निर्णय घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारनेही हा निर्णय घेणे आवश्यक आहे. बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी असा बोलघेवडेपणा मुख्यमंत्र्यांनी न करता केंद्राकडे हा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. शिंदेंच्या शिवसेनेनं नामांतराला विरोध केला. यावरुनही हर्षवर्धन सकपाळ यांनी टीका केलीय. हे गॅंग ऑफ ट्रीपल इंजिन सरकार आहे. सरकारमध्ये धूसपूस चालू आहे. तुझ माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती सरकारची असल्याचे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES