India Aghadi Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकावरुन दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण पेटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. एम.के स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर इंडियाआघाडीते नेते चेन्नईतून थेट मुंबईत दाखल झाले. 'इंडिया आघाडी'च्या नेत्यांची शरद पवारांसोबत 45 मिनिटं चर्चा केली. 45 मिनिटांत तुफान घडामोडी घडल्या. मात्र, बैठकीत काय झाले? शरद पवारांनी काय निर्णय दिला महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सप्सेंस वाढला आहे.
'इंडिया आघाडी'च्या नेत्यांकडून शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. पवारांसोबत 45 मिनिटं चर्चा झाली. शरद पवारांचं मन वळवण्यात इंडिया आघाडीला यश की अपयश? याची माहिती समोर आलेली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलिमिटेशनला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, आता पवारांसोबत झालेल्या चर्चेत नेमकं काय ठरलं. पवारांचं मन वळवण्यात इंडियाच्या नेत्यांना यश मिळालं का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे..
ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "आमचा लढा सुरू आहे. सर्व काही ठीक आहे." यामुळे शरद पवारांनी काय निर्णय घेतला हे समजू शकले नाही.
आज काँग्रेस सह INDIA आघाडीतील केंद्रीय नेत्यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. डिलिमिटेशन बिलाला का विरोध करायला हवा याबाबत राहुल गांधी सह सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. शरद पवारांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले पण स्वत ची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या विशेष अधिवेशनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही विधेयकाच्या बाजूने की विरोधात हे आता गुलदस्त्यात आहे.
डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका, असं पत्र रोहित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना दिलंय... विधेयकाला पाठिंबा दिल्यास पुरोगामी विचारांना धक्का बसेल... दबाव झुगारुन डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा, असं रोहित पवार म्हणालेत... डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा म्हणजे जनतेशी प्रतारणा असल्याचं रोहित पवार पत्रात म्हणालेत... तर रोहित पवारांनी सुळेंना दिलेल्या पत्रावर पक्षाचं नाव आणि चिन्ह नाही आहे...