SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शरद पवार शेवटच्या क्षणी निर्णय बदलणार? 45 मिनिटांत तुफान घडामोडी, महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सर्वात मोठा सप्सेंस!

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. 'इंडिया आघाडी'च्या नेत्यांची शरद पवारांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात 45 मिनिट मोठ्य घडामोडी घडल्या.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 29, 2026, 23:48 IST | Updated: Nov 29, 2026, 23:50 IST
Join

India Aghadi Sharad Pawar :  डिलिमिटेशन विधेयकावरुन दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण पेटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे.  एम.के स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर इंडियाआघाडीते नेते चेन्नईतून थेट मुंबईत दाखल झाले.   'इंडिया आघाडी'च्या नेत्यांची शरद पवारांसोबत 45 मिनिटं चर्चा केली.  45 मिनिटांत तुफान घडामोडी घडल्या. मात्र, बैठकीत काय झाले? शरद पवारांनी काय निर्णय दिला  महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सप्सेंस वाढला आहे. 

'इंडिया आघाडी'च्या नेत्यांकडून शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. पवारांसोबत 45 मिनिटं चर्चा झाली.  शरद पवारांचं मन वळवण्यात इंडिया आघाडीला यश की अपयश? याची माहिती समोर आलेली नाही.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलिमिटेशनला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, आता पवारांसोबत झालेल्या चर्चेत नेमकं काय ठरलं. पवारांचं मन वळवण्यात इंडियाच्या नेत्यांना यश मिळालं का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.. 

राहुल गांधींची प्रतिक्रिया

ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "आमचा लढा सुरू आहे. सर्व काही ठीक आहे." यामुळे शरद पवारांनी काय निर्णय घेतला हे समजू शकले नाही. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया

आज काँग्रेस सह INDIA आघाडीतील केंद्रीय नेत्यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. डिलिमिटेशन बिलाला का विरोध करायला हवा याबाबत राहुल गांधी सह सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. शरद पवारांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले पण स्वत ची भूमिका स्पष्ट केलेली नाही.  त्यामुळे उद्या होणाऱ्या विशेष अधिवेशनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही विधेयकाच्या बाजूने की विरोधात हे आता गुलदस्त्यात आहे. 

डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका; रोहित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना पत्र

डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका, असं पत्र रोहित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना दिलंय... विधेयकाला पाठिंबा दिल्यास पुरोगामी विचारांना धक्का बसेल... दबाव झुगारुन डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा, असं रोहित पवार म्हणालेत... डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा म्हणजे जनतेशी प्रतारणा असल्याचं रोहित पवार पत्रात म्हणालेत... तर रोहित पवारांनी सुळेंना दिलेल्या पत्रावर पक्षाचं नाव आणि चिन्ह नाही आहे...

 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES