'झी 24 तास'च्या उत्सव बांधिलकीच्या कार्यक्रमानंतर शेतक-यांना मदतीचा ओघ सुरू
फुलसिंग लालू चव्हाण या शेतक-याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी 50 हजार रूपयांची मदत केली आहे.
'झी २४ तास'नं शेतक-यांच्या बांधावर जात दिवाळी साजरी केली होती, दुष्काळामुळे हतबल झालेल्या शेतक-यांना 'झी २४ तास'नं आधार दिला होता, तसंच शेतक-यांच्या व्यथाही जाणून घेतल्यात. दरम्यान यानंतर आता शेतक-यांना मदत मिळायला सुरूवात झाली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
चाऱ्याअभावी जनावरं विकण्याची वेळ
बुलढाण्यातील सिंदखेडराजामधील नाईकनगर इथल्या शेतक-यावर पाणी आणि चाराअभावी जनावरं विकण्याची वेळ आली होती.. मात्र झी २४ तासनं या शेतक-याच्या अडचणी समजून घेतल्या आणि तसंच त्यांना धीर दिला. आणि मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं.. दरम्यान यानंतर फुलसिंग लालू चव्हाण या शेतक-याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी 50 हजार रूपयांची मदत केली आहे.
50 हजारांची मदत
सिंदखेड राजातील शेतकऱ्याला मदत मिळाली आहे.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा शेतकऱ्याला 50 हजारांची मदत केली. उत्सव बांधिलकीचा झी 24 तासची दिवाळी या कार्यक्रमात शेतकरी यांनी येथा माडल्या होत्या. फुलसिंग लालू चव्हाण त्या शेतकऱ्याचे नाव असून ते बुलढाण्यातील नाईक नगरमध्ये राहतात.
शेतकऱ्याने मानले आभार
माझ्या डोळ्यात अश्रू होते. ते माझ्या घरी आहे. मी शेण काढत होतं. डोंगरात गवत, पाणी आणतो. कठीण परिस्थितीत आमचे दिवस चाललेयत. झी 24 तासची टीम आली. तुम्ही येऊन आमची परस्थिती पाहिली आणि आम्हाला मदत केली. मदतीबद्दल धन्यवाद असे फुलसिंग चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले शेखर मुंदडा?
आम्ही मदत करणारे प्रामाणिक माणसांच्या शोधात असतो. त्यामुळे मी 24 तासचे जास्त आभार मानेन. तुम्ही या शेतकऱ्याला आमच्यापर्यंत पोहोचवलात. दिवाळीमध्ये फाटलेले कपडे घालूनही गायींचं चांगले संगोपन करतायत. असे काही असेल तर झी 24 तासने मला संधी द्यावी. मी तुमच्यासोबत उभा राहीन आणि जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले.