SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुड न्यूज; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही. नियमाचा उमेदवारांवर कसा होणार परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 21, 2026, 08:48 IST | Updated: Nov 21, 2026, 09:07 IST
Image Credit: शिक्षक भरती निर्णय
Join

शिक्षक होण्याची इच्छा असूनही वयाची कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे भरती प्रक्रियेपासून दूर राहावे लागणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीसाठी आता कमाल वयोमर्यादेचे बंधन लागू राहणार नाही. काय आहे नवा नियम? याचा शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.


काय नेमकं प्रकरण?

आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना केवळ वय जास्त असल्यामुळे शिक्षक भरतीतून बाद करता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाने 5 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करून याबाबत स्पष्टता दिली आहे.  

कोणत्या शाळा आणि पदांना निर्णयाचा लाभ?

हा निर्णय राज्यातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील थेट भरतीसाठी लागू आहे. म्हणजेच इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा यात समावेश होतो. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार या नियुक्त्यांसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

वयोमर्यादेबाबत संभ्रम का?

शालेय शिक्षण विभागाच्या 7 फेब्रुवारी 2019, 7 मार्च 2019 आणि 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयांमधील काही तरतुदींमुळे खासगी शाळांतील सरळसेवा भरतीसाठी कमाल वयोमर्यादा लागू आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. क्षेत्रीय स्तरावरून यासंदर्भात शासनाकडे निवेदनेही प्राप्त झाली होती. त्यामुळे संबंधित तरतुदींचा नेमका अर्थ स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली. अखेर 5 नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे या संभ्रमावर पडदा टाकण्यात आला. या तीन शासन निर्णयांतील कमाल वयोमर्यादेसंबंधीच्या तरतुदी संबंधित खासगी शाळांच्या भरतीसाठी गैरलागू ठरतील, असे सरकारने नमूद केले आहे.


पात्रतेच्या अटी कायम

कमाल वयोमर्यादा लागू नसली तरी उमेदवारांना नियुक्तीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता आणि इतर नियम पूर्ण करावे लागतील. आरक्षणाचे निकष, कागदपत्र पडताळणी आणि निवड प्रक्रियेतील अटीही कायम राहतील. केवळ वयोमर्यादा नसल्यामुळे नियुक्तीचा थेट अधिकार मिळत नाही.  या निर्णयामुळे वयामुळे संधी गमावण्याची भीती असलेल्या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES