SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकारने अर्ध्या तासासाठी खर्च केले ₹80 लाख, सतेज पाटलांचा लेटर बॉम्ब; 'गोकुळ' कनेक्शन चर्चेत

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी कोर्टातील युक्तिवाद करण्यासाठी वकिलांना तब्बल 80 लाख दिल्याचा गंभीर आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 12:24 IST | Updated: Nov 24, 2026, 12:35 IST
Image Credit: Satej Patil
Join

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांनी प्रहार केला आहे.सरकारने 4 संचालकांसाठी झालेल्या कोर्टातील सुनावणीसाठी युक्तीवाद करणाऱ्या वकीलाला तब्बल  80 लाख दिली अशी माहिती समोर आली. त्यानंतर सतेज पाटील आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकाराने फक्त एका युक्तीवादासाठी 80 लाख  खर्च केला. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांना कोर्टात एक युक्तीवादासाठी  80 लाख दिलेत.

गोकुळमधील समविचारी पॅनेलचे नेतृत्त्व करणाऱ्या आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल 80 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

हे वाचा - 'शरद पवार, सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला मदत करतात, मग...'; 'भाजपची बी-टीम' उल्लेख करत अंजली आंबेडकरांचं विधान

 

 

नेमकं काय प्रकरण आहे?

कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत एकूण 25 जागांसाठी लढत झाली होती. यापैकी 13 जागांवर सतेज पाटील यांच्या महायुतीचे आणि 12 जागांवर महायुतीचे संचालक निवडून आले होते. त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष समविचारी पॅनेलचा होईल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, महायुती सरकारने ऐनवेळी नियम बदलत गोकुळवर चार शासकीय संचालकांची नियुक्ती केली होती. या संचालकांना मतदानाचा अधिकारही बहाल करण्यात आला होता. याविरोधात समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेत शासकीय संचालकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई प्रतिष्ठेची झाली होती. तेव्हा राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES