SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मृत कासवाजवळ जमले अन् अचानक 35 पक्षी मृत पावले, कोयना नदीपात्रातील घटना; निसर्गाचा प्रकोप की आणखी काही...?

कराडमध्ये कोयना नदीपात्रात 35 हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी वनविभागाची धावपळ

Written By Mansi Kshirsagar Edited By Pravin Dabholkar
Published: Oct 30, 2026, 08:08 AM IST | Updated: Oct 30, 2026, 08:10 AM IST
Image Credit: satara bird death
Join

कराडमध्ये कोयना नदीपात्रात एक धक्कादायक व गूढ घटना उघडकीस आली आहे. नदीपात्रात जवळपास 35 हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. एका मृत कासवाजवळ पक्षी जमले अन् काहीच मिनिटांत पक्षी खासी कोसळले अन् तडफडू लागले. यातील काही पक्षांचा मृत्यू झाला तर काही पक्षी अत्यावस्थ स्थितीत स्थानिकांना आढळले आहेत. पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी वनविभागाची धावपळ सुरू असून.  BHNS च्या शास्त्रज्ञांकडून तपासणी करण्यात येणार असून मृत पक्षी मुंबई आणि भोपाळला पाठवण्यात येणार आहेत.

सातारा - कराड येथील कोयना नदीपात्रात 35 हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या परिसरात मृत कासवाजवळ जमलेले ‘पिवळा धोबी’ Yellow Wagtail प्रजातीचे पक्षी काही मिनिटांतच जमिनीवर कोसळले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कराडमध्ये पक्ष्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे वनविभाग सतर्क झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठच्या परिसरात ‘पिवळा धोबी’ अर्थात (Yellow Wagtail) प्रजातीचे पक्षी वावरत होते. याच परिसरात एक कासव मृतावस्थेत आढळले होते. त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्या होत्या. या मृत कासवाजवळ पक्ष्यांचा थवा जमला होता.

मात्र, काही मिनिटांतच हे पक्षी अचानक जमिनीवर कोसळू लागले. कोणतीही स्पष्ट पूर्वलक्षणे दिसत नसताना 35 हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता BHNS च्या शास्त्रज्ञांकडून तपासणी केली असून पक्ष्यांचा मृत्यू पाणी, निसर्गातील बदल की अन्य कारणाने झाला. यासाठी मृत पक्षी मुंबई आणि भोपाळला पाठवले जाणार आहेत.

कृष्णानदीतील हजारो मासे मृत्युमुखी

सांगलीच्या कोरड्या नदीपात्रामध्ये पाणी दाखल झाले आहे,मात्र पाणी दाखल होताच पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कृष्णा नदीमध्ये पाणी पोहचताचं नदीपात्रात कारखान्यांकडून मळीमिश्रीत पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप प्राणीमित्रांकडुन करण्यात येत आहे,गेल्या दहा दिवसापासून कृष्णा नदी कोरडेठाक पडली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES