• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांना प्रत्युत्तर दिलं असून, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत रहा असा इशारा दिला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 30, 2026, 09:58 AM IST|Updated: Oct 30, 2026, 10:16 AM IST
joinshare
'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'
Image Credit: 'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

2

'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

3

'उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, दोघे...', माजी खासदाराचं विधान; एकत्र येण्याचं कारणही सांगितलं

4

त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात महत्त्वाची बातमी! 2 दिवस मंदिर भाविकांसाठी असणार बंद, काय आहे कारण?

5

'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील निकालात धक्का बसल्यानंतर महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पुणे आणि नागपूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय झाल्याने हा पराभव भाजपाला जिव्हारी लागला आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही असा थेट आरोप केला होता. यानंतर आता शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून लायकीत राहा असा इशारा दिला आहे.

"नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत रहा , तुझी लायकी किती तू बोलतो किती", अशी पोस्ट निलेश राणे यांनी केली आहे. याआधीही निलेश राणे यांन पत्रकार परिषदेतून यावर भाष्य करताना टीका केली होती. नवनाथ बन म्हणजे काय भाजपा नाही ना? नवनाथ बन कोण आहे? एक प्रवक्ता आहे. एवढं सगळं तो बोलतोय, त्याच्या मागचा बोलविता धनी पण वेगळा असू शकतो. नवनाथ बनमध्ये एवढी हिंमत नाही हे सगळं बोलायची असं सूचक विधान त्यांनी केलं होतं.

हे ही वाचा - 'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'
 

"आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष हा आमचाच पक्ष आहे, आमचा मित्रपक्ष आहे, आमचा सहयोगी आहे, कुटुंबासारखे राहतो आम्ही. इतर वेळेला तर असे एक दोन लोकांमुळे आमच्या युतीला काही फरक पडत नाही. पण ही जी एक दोन लोकं जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात ना, त्यांनी आत्ताच आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावं. जिभेवर आवर घालावा. नाहीतर आमची जीभ कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे," असंही ते म्हणाले होते.

 

नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2026

 

ते म्हणाले, "आम्ही साताऱ्याला होतो, पक्षाने पाठवलं होतं, सगळे एकोप्याने काम करत होते. मग असं काय झालं की तुम्हाला शिवसेना जबाबदार वाटली? कसलाही पुरावा न देता थेट आरोप करणे चुकीचे आहे." "नवनाथ बन हे भाजपचे प्रवक्ते आहेत, पण त्यांच्यात एवढी ताकद नाही. त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे? आम्ही भाजपचा, फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा आदर करतो. नेत्यांमध्ये प्रेम, संवाद, आपुलकी आहे. मग नको ती लोकं आमच्या पक्षावर बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.

— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 29, 2026

 

"युती आपण युतीमध्ये आहोत. कसलेही पुरावे न देता तुम्ही थेट आरोप करणार. हे बरोबर नाही. युती टिकवायची आहे आपल्याला. भांडणं लावायची असतील तर हे टिकणार नाही. मिसमॅनेजमेंट तुमचं झालंय, त्याचं खापर तुम्ही शिवसेनेवर का फोडताय? नाव घेऊन टीका करा, अमुकांनी काम केलं नाही सांगा. हवेत गोळीबार करू नका. शिवसेनेवर बोलाल तर शिवसेनेसारखेच उत्तर मिळेल," असं त्यांनी म्हटलं.


नवनाथ बन यांनी केली होती पोस्ट


शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही असंही ते म्हणाले आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
shiv sena
Eknath Shinde
Devendra Fadnavis