• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

भूतानमध्ये ग्लेशियल सरोवर फुटल्यानंतर हाहाकार माजला आहे. त्यामुळं भारतालादेखील अलर्ट देण्यात आला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 10:20 AM IST|Updated: Oct 30, 2026, 10:22 AM IST
joinshare
भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना
Image Credit: bhutan flash flood

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

भूतानमध्ये ग्लेशियर फुटले; भारतात अलर्ट, घर सोडून पळाले लोक, रातोरात गावं खाली करण्याच्या सूचना

2

'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

3

'उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, दोघे...', माजी खासदाराचं विधान; एकत्र येण्याचं कारणही सांगितलं

4

त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात महत्त्वाची बातमी! 2 दिवस मंदिर भाविकांसाठी असणार बंद, काय आहे कारण?

5

'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भूतानमधून एक मोठी बातमी समोर येतेय. गुरुवारी रात्री पुनाखा येथे हिमनदी फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8च्या दरम्यान हिमनदीचे पाणी संकोष नदीच्या तक्सिमाखांग परिसरात पोहोचले होते. भूतानच्या घटनेने भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही जिल्ह्यांत धोक्याची सूचना दिली आहे.

भारत सरकारने एक विशेष अॅडवायजरी जारी केली आहे. या मुळं संकोष नदीच्या जलस्तरमध्ये अचानक वाढले आहे. या दरम्यान बंगालच्या अलीपुरद्वार आणि असमच्या धुबरी जिल्हा प्रशासनाने लोकांना सतर्कता राखण्याचे अवाहन केले आहे. तसंच, प्रशासनाकडून वेळीच कठोर पावलं उचलण्यात येत आहेत.

भूतानच्या गासा जिल्ह्यातील लाया गेवोगच्या लुंगो भागात, वाकिला पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या शिंताफू सरोवरात गुरुवारी संध्याकाळी हिमनदीच्या पाण्याचा उद्रेक होऊन पूर आल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर, नदीकाठावर राहणाऱ्या रहिवाशांना सतर्क करण्यासाठी धोक्याची सूचना देण्यात आली. बाधित झालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंताफू सरोवर हे भूतानमधील 17 हिमनदी सरोवरांपैकी एक आहे, जे  धोकादायक मानले जाते. भूतानच्या राष्ट्रीय जलविज्ञान आणि हवामानशास्त्र केंद्राने सांगितले की, ताक्तसिमाखाउंग येथे एक विशेष जलपातळी निरीक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीवरून अद्याप हे स्पष्टपणे दिसून येत नाही की किती पाणी सोडले जाईल आणि त्याचा खालच्या प्रवाहाकडील भागांवर काय परिणाम होईल.

भूतानच्या पुनाखामध्ये मो छू नदीला आलेल्या पुरामुळं संपूर्ण शहरच उद्ध्वस्त झालं आहे. पुरामुळं दोछुका-जोमलिंगथांग-रित्सा-चीवोगामध्ये बसवण्यात आलेल्या सोलर इरिगेशन लिफ्टिंग सिस्टिमचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरानंतर सोलर सिस्टम पूर्णपणे बंद झाला आहे.

या हिमनदी सरोवराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, भारताने एक विशेष सूचना जारी केली आहे, ज्यात म्हटले आहे की पुनात्सांगछू नदीच्या वरच्या भागात अचानक येणाऱ्या पुरामुळे पश्चिम बंगालमधील अलीद्वारपूर जिल्हा आणि आसाममधील धुबरी जिल्ह्यात नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढू शकते. या घटनेनंतर 8 ते 10 तासांच्या आत पुराचे पाणी भारत-भूतान सीमेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर भाजप खासदार राजू बिष्ट यांनी काल रात्री उशिरा धोक्याचा इशारा दिला. त्यांनी एक्स-पोस्टमध्ये सांगितले की, भूतानमधील लेमथांग येथे हिमनदी सरोवराच्या उद्रेकामुळे पूर आला आहे. सरोवरातून वाहणारे पाणी मोफू नदीमार्गे सुनकोश नदीच्या दिशेने खाली वाहत आहे. त्यामुळे, सुनकोश नदी आणि तिच्या सर्व उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षेसाठी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दार्जिलिंग टेकड्या, तराई आणि दुआर्स भागातील सर्व रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather News
International News
india