SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठी बातमी! पोलीस दलात मोठे फेरबदल, एकाचवेळी 18 पोलिसांच्या बदल्या

पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश गृह विभागाने 2 नोव्हेंबर रोजी काढला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 08:25 AM IST | Updated: Nov 03, 2026, 08:37 AM IST
Image Credit: Maharashtra police
Join

महाराष्ट्राच्या पोलीस विभागात मोठे खांदेपालट करण्यात आले आहे. एकाचवेळी 18 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 काढले आहेत. महाराष्ट्र राज्यभरातील डीसीपी (DCP) आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिली गेले आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे तीन पोलीस अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात कोकण परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक  शिवराज पाटील, ठाणे शहराचे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव आणि ठाणे शहर परिमंडळ 5 पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांच्या समावेश आहे.

अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून अनमोल मित्तल (भापोसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पूर्वी ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक होते. तर अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूरला बदली झाली आहे. चेतना तिडके यांच्याकडे  पोलीस अधीक्षक (अभियान, अंमली पदार्थविरोधी) पथकाची जबाबदारी देण्यात आली. 

अनमोल मित्तल हे 2021 च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरमधील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. अंबाजोगाईमध्ये बदलीनंतर त्यांच्यावर अंबाजोगाई विभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे लागणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES