SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कुठे पाऊस, कुठे दाट धुके? नोव्हेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील वारं फिरलं, कसं असेल आजचं हवामान?

अकावन वादळ शांत झालं असलं तरी देशासह महाराष्ट्रावरील वारं फिरलं आहे. कुठे पाऊस, कुठे गारठा तर काही ठिकाणी हवामानात मोठा बदल पाहिला मिळणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 07:23 IST | Updated: Nov 23, 2026, 07:27 IST
Image Credit: maharashtra weather update 22 nov
Join

पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवत आहे. अगदी मुंबईतही पारा पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे. या आठवड्यात मुंबईत पारा आणखी घसरणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत 20 अंशांच्या खाली पारा गेल्यामुळे मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता आला.

दरम्यान नोव्हेंबरच्या अखेरीस देशभरातली हवामानात मोठा बदल पाहिला मिळणार आहे. थंडी, दाट धुके तर कुठे पाऊस असं तिहेरी वातावरण पाहिला मिळणार आहे.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आजच्या अंदाजानुसार आज राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये वातावरण साधारण कोरडे राहणार आहे. नागपुरात पावसाचा अंदाज दिला होता, पण आज तिथेही कोणताही इशारा नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडीची झुळुक जाणवणार आहे. जर मध्य महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार आहे. पण पहाटे आणि रात्रीच्या वेळी स्वेटर घालण्याची वेळ येणार आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील आजचं वातावरण कसं राहिल तर नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमधील नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेणार आहे. पण पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कोरडं राहणार आहे. पण हो, सकाळी आणि रात्री वातावरण थंड असणार आहे.

 

 

विदर्भात थंडी, उन्ह आणि पावसाचा असा वातावरणात तिरेही संयोग दिसत होता. तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार आहे. काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हिवाळीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रातून देशातील कानाकोपऱ्यात फिरायला जातात. अशात देशात काही ठिकाणी दाट धुकं, कुठे गार गार वारे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये 27 नोव्हेंबरदपर्यंत, तर केरळमध्ये 26  नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशातील काही भागांत दाट धुक्याची चादर असणार आहे. साऊथ साइडला पावसाचा अंदाज आहे. तर राज्यांमध्ये दाट धुक्यासह थंडीचा जोर वाढणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES