SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता 8 तासांपेक्षा जास्त काम, सुट्टीच्या दिवशी ड्युटी तुमचा फायदा; वेतन नियमात मोठा बदल!

महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू झालाय. त्यानुसार आठ तासांचा सामान्य कामाचा दिवस, ४८ तासांची साप्ताहिक मर्यादा, सुट्टीच्या दिवशी कामासाठी दुप्पट वेतन आणि पगार कपातीवर ५० टक्क्यांची मर्यादा याबद्दल जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 19, 2026, 11:30 IST | Updated: Nov 19, 2026, 11:44 IST
Image Credit: वेतन नियमात नियमात बदल
Join

महाराष्ट्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र वेतन नियम, 2026’ लागू केले असून 5 नोव्हेंबरपासून हे नियम लागू झाले आहेत. यामुळे कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी, ओव्हरटाइम, वेतनातील कपात आणि पगाराच्या नोंदी याबाबत नवी चौकट तयार झाली आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्याच्या वेतनातून होणारी एकूण कपात 50 टक्क्यांपेक्षा जास्त करता येणार नाही. तसेच साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम करावे लागल्यास ठरावीक अटींनुसार दुप्पट दराने वेतन मिळण्याची तरतूद आहे. नेमके काय बदलले आहेत, जाणून घेऊया.

आठ तासांचा कामाचा दिवस

नव्या वेतन नियमांनुसार, दैनिक वेतनाच्या आधारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य कामाचा दिवस आठ तासांचा असणार आहे. तर दैनिक वेतनाव्यतिरिक्त इतर वेतनपद्धती असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील एकूण कामाचे तास 48 पेक्षा अधिक असू नयेत, अशी तरतूद आहे.

साप्ताहिक सुट्टी आणि दुप्पट वेतनाचा नियम

प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यात किमान एक दिवस विश्रांती देण्याची तरतूद आहे. सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्यात ही सुट्टी सामान्यतः रविवारी असेल. असे असले तरी कंपनी किंवा आस्थापना गरजेनुसार दुसरा दिवसही निश्चित करू शकते. कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावल्यास त्याला बदली विश्रांतीचा दिवस देण्याची अट आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्या दिवशी केलेल्या कामासाठी सामान्य वेतनदराच्या किमान दुप्पट दराने मोबदला द्यावा लागणार आहे.

पगारातून 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपात करता येणार नाही

नव्या नियमांतील महत्त्वाची तरतूद म्हणजे वेतन कपातीची मर्यादा. कर्मचाऱ्याच्या एका वेतन कालावधीतील एकूण अधिकृत कपात त्याच्या वेतनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. कपातीची रक्कम या मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उर्वरित रक्कम पुढील वेतन कालावधीत वसूल करता येईल. मात्र, त्या वेळीही 50 टक्क्यांची मर्यादा पाळावी लागणार आहे. दंड किंवा नुकसानीच्या कारणावरून कपात करण्यापूर्वी कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देणेही आवश्यक असणार आहे.

पगाराची स्लिप देणे बंधनकारक

कर्मचाऱ्यांना सॅलरी स्लिप देण्याची तरतूद करण्यात आलीय. वेतन देण्याच्या दिवशी किंवा त्यापूर्वी ही स्लिप द्यावी लागणार आहे. त्यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, इतर भत्ते, अतिरिक्त कामाचे वेतन, एकूण कपात आणि प्रत्यक्ष मिळणारे वेतन यांचा तपशील असणे अपेक्षित आहे. यासोबतच कर्मचारी, वेतन, अतिरिक्त वेतन आणि उपस्थितीच्या नोंदी इलेक्ट्रॉनिक किंवा कागदी स्वरूपात ठेवाव्या लागतील. शेवटची नोंद केल्यापासून या नोंदी पाच वर्षे जतन करणे बंधनकारक आहे.

कर्मचाऱ्यांना करता येणार तक्रार

नवीन वेतन कायद्यात कर्मचाऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.किमान वेतन न मिळणे, ओव्हरटाइमचा मोबदला न देणे, साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाबाबत तक्रार किंवा समान कामासाठी लिंगाच्या आधारावर वेतनभेदभाव अशा प्रकरणांमध्ये संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे. कर्मचारी, नोंदणीकृत कामगार संघटना आणि संबंधित निरीक्षक-तथा-सुविधाकार यांच्यामार्फत वेतनासंबंधी दावे दाखल करण्याची तरतूद आहे. याआधी लागू असलेले महाराष्ट्र किमान वेतन नियम, 1963 आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, 1963 यांची जागा आता नव्या नियमांनी घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाची स्लिप, उपस्थिती आणि ओव्हरटाइमच्या नोंदी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES