पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील आंबे गावातील घटनेमध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील आंबे गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विहीर खोदत असताना त्यात कोसळून चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले असून दोघांचा अजून शोध सुरू आहे. NDRF टीमने पोकलेनच्या माध्यमातून कामगाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण चौघांना वाचविण्यात त्यांना यश आलं नाही. एनडीआरएफ पथक दाखल झाल्यानंतर सिद्धू घाडगे आणि मंगेश मोरे या दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलंय. तर इतर दोन कामगारांचे नाव तानाजी घोडके आणि आबा घोडके असं आहे.
दरम्यान, काल रात्री उशिरा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे घटनास्थळी पोहोचले होते. रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करत ते रात्री उशिरापर्यंत थांबले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेएन, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मृत मजुराच्या कुटुंबीयांना पाच लाखाची तातडीची मदत जाहीर केलीय.
नेमकं काय घडलं?
आंबेगावमधील श्रीनिवास शिंदे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते, त्यावेळीही दुर्घटना घडली. विहिरीचे काम जवळपास पूर्ण झालं होतं. आतील मोजमाप घेण्यासाठी चार मजूर खाली उतरले होते. मात्र काळा आला होता. विहिरीच्या काठ्यावर असलेल्या मातीचा ढिगाऱ्याचा सगळा भाग अचानक विहिरीत कोसळला आणि या सर्व ढिगार्याखाली हे चार मजूर अडकले. दुर्दैवाने या दुर्घटनेत त्यांच्या मृत्यू झाला आहे.
यानंतर पोकलेन मागून बचाव कार्य सुरू करण्यात आले मात्र विहिरीत पडलेला दगड मातीचा ढिगारा हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना वाचविण्यात अपयश आलं.पंढरपूर तहसीलदार आणि पंढरपूर तालुका पोलीस यांनी माती आणि दगडाचा ढिगारा काढण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ पथकाला बोलवले होतं. एनडीआरएफ येण्यापूरर्वी पोकलेनच्या माध्यमातून विहिरीतील पडलेला ढिगारा काढण्याचे काम करण्यात आलं. पण चार मजुरांना वाचवता आलं नाही. दरम्यान या विहिरीचे काम 15 दिवसापासून सुरू होते. अचानक दगड निसटले अचानक सगळा ढिगारा खाली पडला आहे.