SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

Petrol Diesel Rates Today 27 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील काही काळात चढ उतार पाहायला मिळत आहेत. तेव्हा 27 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील इंधन दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 07:54 AM IST | Updated: Oct 27, 2026, 09:02 AM IST
Image Credit: आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
Join

Petrol Diesel Rates Today 27 October 2026 : 27 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. मात्र मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतेही बदल झालेला नाही. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :

मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
नोएडा: 102.12 रुपये प्रति लीटर
कोलकता: 113.51 रुपये  प्रति लीटर 
चेन्नई : 107.76 रुपये  प्रति लीटर 
भोपाल: 114.57 रुपये  प्रति लीटर
पटना:113.37 रुपये प्रति लीटर 
बेंगलुरु: 110.93 रुपये प्रति लीटर 
भुवनेश्वर: 109.92 रुपये प्रति लीटर 
चंडीगढ़: 98.10 रुपये प्रति लीटर 
हैदराबाद: 115.69 रुपये प्रति लीटर

तुमच्या शहरातील डिझेल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :

मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
नोएडा: 95.56 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर
भोपाल: 99.64 रुपये प्रति लीटर
पटना: 99.36 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 98.80 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 100.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 86.09 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 103.82 रुपये प्रति लीटर

CNG च्या किंमतीत वाढ?

27 ऑक्टोबर रोजी अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमतीत थोड्या फार प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी मुंबईत CNG ची किंमत ही 36 ऑक्टोबर रोजी 1 रुपयांनी वाढली होती. मुंबईत CNG ची किंमत ही 89 झाली आहे. बंगळुरूमध्ये किंमतीत 1 रुपयाची वाढ होऊन ती 98 रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईमध्ये 2 रुपयांची वाढ झाल्यामुळे किंमत 99.50 रुपयांवर आली आहे. मथुरा आणि मेरठमध्येही CNG च्या किमतीत प्रत्येकी 2 रुपयांची वाढ झाली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES