SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्पावर दुहेरी संकट; वनविभागानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दणका, 5675 कोटींचा प्रकल्प झाला बंद

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून उभारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प हा सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात आहे. या प्रकल्पाला एकापाठोपाठ दोन फटका बसला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 21, 2026, 16:04 IST | Updated: Nov 21, 2026, 16:33 IST
Image Credit: satara adani patan tarali
Join

महाराष्ट्रातील कर्जत-भीमाशंकरमधील टोरेंट प्रकल्पाला विरोध होत असताना आता साताऱ्यातील अदानीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प दुहेरी अडचणीत सापडला आहे. सातारा जिल्ह्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला काम बंद करण्याचे आदेश देत मोठा दणका दिला आहे.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलं की, प्रकल्पावर आवश्यक परवानगी आणि पर्यावरणीय मंजुरीशिवाय काम सुरू असल्याचे समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मौजे सावरघर इथल्या गट क्रमांक 33 आणि 34 मध्ये पाहणी केली. तेव्हा असं दिसून आलं की, आवश्यक परवानग्यांशिवाय उत्खनन आणि विकासकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली तसंच प्रस्तावित उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. 

हेसुद्धा वाचा - पुण्यातील धक्कादायक घटना! 19 वर्षीय लेक सकाळी कॉलेजला गेली, मध्यरात्री पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार अन् मग 14 तासानंतर लिफ्टमध्ये...

वनविभागाने 13 नोव्हेंबरला अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. रोहन भाटे यांनी या प्रकल्पाबद्दल तक्रारी केल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय. 

ह्या प्रकल्पामुळे वृक्षांची तोड करण्यात येत आहे. ज्यामुळे या प्रकल्पामुळे पर्यावरणास नुकसानदायक आहे, त्यामुळे याला विरोध करण्यात येत आहे. दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे युवक आंदोलक विवेकानंद पाटील यांनी 15 नोव्हेंबरला प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन इथल्या प्रकल्पाची पाहणी केली. परिसरातील कामाची पाहणी केल्यावर हे काम अनधिकृत असून त्याबद्दल पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळला. 

नेमका काय आहे हा प्रकल्प?

अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा हा प्रकल्प साताऱ्यातील तारळी नदीच्या खोऱ्यात आहे. इथे 1500 मेगावॉट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES