शिंदेंचा 'गुवाहाटी रिटर्न' माजी आमदार भाजपमध्ये, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का
तिकीट कापल्यानंतर 36 तास गायब झालेले आणि शिंदेंच्या गुवाहाटी रिटर्न माजी आमदारने एकना शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचा तो एकनाथ शिंदेंसोबतचा मोठा बंडामध्ये साथ दिलेल्या माजी आमदाराने मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार श्रीनिवास वगना यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत वनगाने एकनाथ शिंदेंची साथ सोडत भाजपचा कमळ हातात घेतला आहे. रवींद्र चव्हाण यांनी पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी केलं आहे. हा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का मानला जातोय. वनगा हे शिंदे गटावर नाराजीचे सूर तेव्हा उमटले जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. तेव्हापासून वनगा हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपासून दूर गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची नाराजी आणि बंडाची भूमिका अख्खा महाराष्ट्राने पाहिली.
श्रीनिवास वनगा राजकीय परिचय!
पालघर विधानसभा मतदारसंघाचे श्रीनिवास वनगा हे माजी आमदार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख आणि स्थान निर्माण केलंय. ते सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत गेले. एकनाथ शिंदेंसोबत त्यांनी या गटाला स्थापन करण्यासाठी काम केलं. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीची ठिणगी पडली. त्यानंतर शिंदे गटा घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे वनगा हे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी जाहीररित्या दाखवली देखील होती. याच नाराजीचा फायदा घेत पालघरमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस घडवलं.
वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका मानला जातोय. कारण वनगा यांचा राजकीय अनुभव, प्रवास आणि स्थानिक पातळीवर त्यांचं संपर्क याचा मोठा फायदा आता भाजपला मिळणार यात शंका नाही. या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात महायुतीतील दोन पक्षांमधील स्थानिक राजकीय गणिते कसे असेल हे भविष्यात पाहण्यासारखे राहणार आहे.