SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोकणच्या हापूस आंब्यावर गुजरातची नजर, थेट दावाच केला; प्रकरण कोर्टात, काय घडलं नेमकं?

रत्नागिरी- कोकणच्या हापूस आंब्यावर गुजरातचा दावा प्रकरण. निकाल जरी राखून ठेवला गेला असला तरी गुजरातला हापूस मानांकन देण्यास बागायतदारांचा ठाम विरोध

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 21, 2026, 09:03 IST | Updated: Nov 21, 2026, 09:09 IST
Image Credit: The debate between Konkan Hapus and Gujarat Hapus on GI tag
Join

कोकणातील अस्सल हापूस म्हणजे महाराष्ट्रातील खवय्यांचा जीव की प्राण मात्र याच हापूसबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. रत्नागिरी- कोकणच्या हापूस विरुद्ध वलसाड गुजरात हापूस वादात मोठी घडामोड समोर येतेय. कोकणच्या हापूसला वलसाड गुजरात हापूसने आव्हान दिलं आहे. गुजरातने केलेल्या अर्जावर चेन्नईमध्ये अंतिम सुनावणी पार पडली आहे. सुनावणी दरम्यान GI रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना एक महत्त्वाची सूचना केली आहे.  

2018 मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी 'कोकण हापूस'ला पहिले आणि एकमेव GI मानांकन मिळाले. 2023 मध्ये भारतीय किसान संघ (गांधीनगर) आणि नवसारी कृषी विद्यापीठाने 'वलसाड हापूस' नावाने स्वतंत्र GI मानांकन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. याला कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस उत्पादक संस्था आणि बागायतदारांनी या दाव्याला कडाडून विरोध केला आहे. कोकणची जमीन, हवामान आणि चव यातील तांत्रिक व वैज्ञानिक फरक पुराव्यानिशी मांडण्यात आले आहेत.

भौगोलिक वैशिष्ट्यानुसार कोकणातल्या पाचही जिल्ह्यातील हापूसची चव त्याचा रंग त्याची साल ही वेगळी. अविट गोडी मुळे कोकणातला हापूसला वेगळा दर्जा. या दर्जाची तुलना गुजरातच्या वलसाड आंब्याशी होणार नाही. त्यामुळे ऑफिसचं जीआय मानांकन गुजरातला देऊ नये. अन्यथा कोकणातला अंबा बागायतदार रस्त्यावर उतरेल. केंद्र आणि राज्य सरकारनं या संदर्भातील भूमिका जाहीर करावी, अशी मागणी कोकणातल्या आंबा बागायदारांनी केली आहे.

कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस उत्पादक संस्था आणि बागायतदारांनी या दाव्याला कडाडून विरोध केला आहे. कोकणची जमीन, हवामान आणि चव यातील तांत्रिक व वैज्ञानिक फरक पुराव्यानिशी मांडण्यात आले आहेत. वलसाड हापूसला वेगळं GI मिळावं, यासाठी गुजरातने केलेल्या अर्जावर चेन्नईमध्ये अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी दरम्यान GI रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना एक महत्त्वाची सूचना केली आहे.  समाजाच्या मोठ्या हितासाठी दोन्ही बाजूंनी तडजोड करावी, सामंजस्याने मार्ग काढावा, असं रजिस्ट्रीने सांगितलंय.

दरम्यान, सुनावणी संपली असून आता निकाल ठेवला गेलाय राखीव. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सुनावणीनंतर निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने आणि हापूस उत्पादक संस्थेने याला जोरदार विरोध केला आहे.

कोकणच्या हापूसचे महत्व कधीच कमी होणार नाही: तटकरे

मानांकनासाठी कोणी किती प्रयत्न केले तरी कोकणच्या हापुस आंब्याचे महत्व कधीच कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. कर्नाटकात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. बिगरमोसमी आंब्याचे उत्पादन घेतले जाते हे सांगताना वलसाडच्या आंब्यासाठी त्यांचे ते प्रयत्न करतील. कोणी किती प्रयत्न केले तरी कोकणच्या हापूस आंब्याची चव आगळी वेगळीच राहणार आहे. प्रत्येकाला आपल्या राज्यात जे जे पीक येते त्याच मानांकन करण्याचा अधिकार राहू शकतो असंही मत त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES