• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह, घर आणि ऑफिसची केली रेकी

टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह, घर आणि ऑफिसची केली रेकी

Tiger Shroff Attack News : टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या घराची तर रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा रेकी केली होती. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 22, 2026, 09:21 AM IST|Updated: Oct 22, 2026, 10:17 AM IST
joinshare
टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह, घर आणि ऑफिसची केली रेकी
Image Credit: टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह, घर आणि ऑफिसची केली रेकी

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Tiger Shroff Attack News : मागील रविवारी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला होता. यात टायगरच्या कारवर तीन अज्ञात लोकांनी गोळीबार करत तीन राउंड फायर केले. यात सुदैवाने टायगरला किरकोळ दुखापत झाली असली तरी यात त्याच्या ड्रायव्हर मात्र गोळी लागून गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आज आरोपींना मुंबईतील किला कोर्टात हजर केलं जाणार आहे. असं असतानाच त्या संदर्भात आता अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची रेकी केली होती. एवढंच नाही तर अभिनेता रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा आरोपींनी रेकी केली असल्याचं समोर आलं आहे. सदर बातमीमुळे इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे. रणबीर कपूर हा देखील हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलंय.

रणबीर कपूरच्या घराची रेकी :

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्याआधी रणबीर कपूरच्या घराची सुद्धा रेकी केल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे. रणबीरच्या बांद्रा येथील घराची रेकी करण्यात आली, त्यामुळे टायगरच नाही तर बॉलिवूडमधील इतर काही सेलिब्रिटी देखील हल्लेखोऱ्यांच्या रडारवर होते अशी माहिती समोर आली आहे. यामुळे  सेलिब्रिटींमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. सलमान खानच्या घरी सशस्त्र कमांडो तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या घराबाहेर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.

रणवीर सिंहच्या ऑफिसची रेकी :

अभिनेता टायगर श्रॉफच्या संदर्भातील गोळीबाराच्या घटनेच्या तपासात, मुंबई गुन्हे शाखेला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या अंकितने ज्याला यापूर्वी पकडलेल्या फूल सिंग, रेहान आणि हृतिक या तीन शूटर्ससोबत अटक करण्यात आली होती. त्याने चौकशीदरम्यान कबूल केले की, त्यांनी अनिल पंडित याच्या सूचनेवरून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची रेकी केली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Tiger Shroff
Ranveer Singh
Ranbir Kapoor
Entertainment News