SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सोनिया गांधींनी शरद पवारांची भेट का टाळली? चेन्नईला गेल्या पण मुंबईत का आल्या नाहीत? राजकीय वर्तुळात तर्क वितर्क

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, सोनिया गांधींनी शरद पवारांची भेट टाळल्याची चर्चा आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 30, 2026, 00:17 IST | Updated: Nov 30, 2026, 00:19 IST
Join

Sonia Gandhi :  शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे.  इंडिया आघाडीचे नेते शरद पवारांचे मन वळण्याचा प्रयत्न करत आहेत.  इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन शरद पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी देखील येतील आणि पवारांची भेट घेतील अशी माहिती सकाळी मिळाली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी शरद पवारांची भेट टाळली आहे. 

सोनिया गांधी इंडियाआघाडीच्या शिष्टमंडळासोबत  चेन्नईला  गेल्या होत्या. तिथे त्यांनी एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. एम के स्टॅलिन यांची समजूत करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून करण्यात आला. या प्रयत्नामध्ये सोनिया गांधी स्वतः होत्या. पुढे त्या मुंबईला देखील येणार होत्य.. मात्र, अपरिहार्य कारणामुळे ऐनवेळी त्यांनी मुंबईचा दौरा रद्द केला आणि दिल्लीला परतल्या. यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट टाळल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एम.के स्टॅलिन यांची समजूत काढण्यात राहुल, सोनिया गांधींना अपयश आलं आहे.  एम.के स्टॅलिन यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगे हे तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या भेटीसाठी गेले होते.  दरम्यान स्टॅलिन यांच्यासोबत दोन तास चर्चा करूनही त्यांची समजूत काढण्यात सोनिया, राहुल गांधींना यश आलं
नाही. एम.के स्टॅलिन हे एनडीएला पाठिंबा देण्यावर ठाम आहेत.

उद्धव ठाकरे यांचे शरद पवारांना आवाहन

महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केलं आहे. 
लोकशाहीचा गळा घोटल्यानंतर अश्रू ढाळून उपयोग नसल्याचं टीकास्त्र देखील त्यांनी डागलं आहे. तर स्टॅलिन यांच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. स्टॅलिन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डिलिमिटेशन बिलाला समर्थन दर्शवलं आहे.

संजय राऊतांची राष्ट्रवादी SPवर टीका 

संजय राऊतांनी अमित शाहांचा जुना व्हिडिओ ट्वीट पोस्ट करत राष्ट्रवादी SPवर टीका केलीय.... शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा अमित शाहांचा व्हिडिओ आहे... सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना टॅग करत, या माणसाला समर्थन देत आहात? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय... त्या पेक्षा राजकारण सोडलेलं बरं, अशी टीका ही राऊतांनी केलीय... 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES