SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

संजय शिरसाठांच्या घरावरील हल्ल्यातील आरोपी निर्दोष? न्यायालयाने दिलासा का दिला? मोठी अपडेट!

संजय शिरसाठ यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती. प्रकरणातील आतापर्यंतच्या घडामोडी जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 16, 2026, 22:08 IST | Updated: Nov 16, 2026, 22:19 IST
Image Credit: संजय शिरसाट (फोटो सौजन्य-गुगल)
Join

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. घरावर बाटल्या फेकून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या तिन्ही तरुणांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात अटकेपासून न्यायालयीन कोठडीपर्यंतची कारवाई झाली. त्यानंतर कोर्टात काय घडलं? कोर्टाने काय निर्णय दिला? सविस्तर जाणून घेऊया.

नेमकी घटना काय घडली होती?

12 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास संजय शिरसाठ यांच्या गोलवाडी लिंक रोडवरील निवासस्थानाबाहेर तीन तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली.  तरुणांनी बंगल्याच्या दिशेने काचेच्या बाटल्या फेकल्या. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता वाद वाढला. तरुणांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलंय या झटापटीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाले.

रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अटकेत

या घटनेनंतर सातारा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. रोहित स्वप्नील भुताळे, शिवम ज्ञानेश्वर गायकवाड आणि प्रतीक चांगदेव कुटे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे, अनधिकृत प्रवेश आणि इतर संबंधित आरोपांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून तिघांची चौकशी करण्यात आली होती.

न्यायालयीन कोठडीनंतर जामीन

अटकेनंतर तिन्ही तरुणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, आता तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झालाय. आरोपींच्या वतीने ॲड. शुभम काहिटे यांनी न्यायालयात बाजू मांडली. जामीन मंजूर झाला असला तरी आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली नाही.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण चर्चेत

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बंगल्यावर नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू झाली. उपलब्ध फुटेजमध्ये बाटल्या फेकल्याचे स्पष्ट दिसत नसल्याचा दावा केला जातोय.

शिरसाठांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

या घटनेनंतर संजय शिरसाठ यांनी स्थानिक पोलिसांच्या प्रतिसादाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्या निवासस्थानाबाहेर गंभीर प्रकार घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने उपलब्ध झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे मंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला. आता तिन्ही आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीत काय घडते? याकडे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES