• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

आदित्य ठाकरेंसह आमदार गोडाऊनमध्ये का बसले? यावर मुंबई विद्यापिठानं स्पष्टीकरण दिलं आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 16, 2026, 21:45 IST|Updated: Nov 16, 2026, 21:52 IST
joinshare
आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!
Image Credit: मुंबई विद्यापीठ

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

2

18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

3

सिंहाचा बाईकवरुन पाठलाग करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घडली जन्माची अद्दल, पाहा VIDEO

4

'विराट कोहलीला 10 वर्षांनी पश्चात्ताप होईल!', कपिल देव यांनी का दिला इशारा?

5

सोन्याचा दर 1.02 लाखावर आला; 2024-2025 च्या दरात सोनं मिळणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई विद्यापीठात आज अभूतपूर्व असा राडा पाहायला मिळाला. आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. कुलगुरुंना भेटायला आलो असता अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा करण्यात आला. यावर आता मुंबई विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलंय.

सुरुवात कुठून झाली?

मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत हे सातत्याने विद्यार्थ्यांशी संबंधित विषयांना वाचा फोडत असतात. काही कॉलेजमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याचा विषय त्यांनी हाती घेतला होता. यानंतर विद्यापीठाकडून त्यांना शोकेस नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस मागे घ्या अन्यथा घराबाहेर आंदोलन करु असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला.आम्ही आता फक्त सभ्य भाषेत चर्चा करायला आलो आहे. जर शाळेत कॉलेज मध्ये अशी परिस्थिती असेल तर सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित करू नये का? असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला विचारण्यात आला. दरम्यान प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचे फोटो काढून शोषल मीडियावर टाका असं आवाहन अदित्य ठाकरेंनी केलं.

 

मुंबई विद्यापीठाने काय म्हटलं?

आदित्य ठाकरेंसह आमदारांना अडगळीत बसवून ठेवलं, या आरोपाचे मुंबई विद्यापीठाकडून खंडन करण्यात आलंय. आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आमदार विद्यापीठात दाखल झाले. आज मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम अंतर्गत सहयोगी प्राध्यापक भरती संदर्भात नियोजित मुलाखती सुरू होत्या. या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग घेणे गरजेचे होते. या मुलाखतीसाठी विविध कुलगुरू आणि तसेच राष्ट्रीय स्तरावरचे नामवंत विषयतज्ज्ञ उपस्थित होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया सुरू असताना सन्माननीय आमदार कार्यकर्ते आणि काही सिनेट सदस्य विद्यापीठात कोणतीही पूर्वसूचना न देता आले. त्यांनी मुलाखती थांबवणाच्या सूचना देऊन कुलगुरूंना चर्चा करण्यासाठी सांगण्यात आले.आमदार, त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते तसेच मीडिया समोर कुलगुरू यांना अर्धवट तसेच चुकीच्या गोष्टींच्या आधारे प्रश्न विचारू लागले. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने आमदारांचे आदरपूर्वक सन्मान करून बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटलंय.

प्रदीप सांवताना नोटीस

प्रदीप सांवत यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसवरही मुंबई विद्यापीठाने भाष्य केलंय. अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने कारणे दाखवा नोटिस बजावली. कोणत्याही वस्तुस्थितीची पडताळणी किवा खातरजमा न करता वारंवार त्यांनी विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दिशाभूल करणारे वृत्त त्यांनी प्रसिद्ध माध्यमांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले आहेत. यातील अलीकडे जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेत कोणतीही पूर्वसूचना किवा परवानगी न घेता त्यांनी प्रवेश करून बांधकाम स्थितीत/ दुरुस्ती सुरू असलेल्या जागेचे फोटो काढून  वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेत. या संस्थेत आवश्यक त्या सर्व सुविधा असून देखील हेतूपरस्पर त्यांनी दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले. तसेच सीडीओईमध्ये 3850 विद्यार्थी नापास झाल्याचे चुकीचे व दिशाभूल करणारे आणि संस्थेची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केले. अश्या अनेक प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचा हेतूपरस्पर प्रयत्न केल्याचे विद्यापीठाने म्हटले. विद्यापीठाचे भागधारक म्हणून त्यांच्या सूचना आणि अभिप्रायाचे विद्यापीठ प्रशासनाने नेहमी स्वागत केले आहे. परंतु त्यांनी भागधारक म्हणून विद्यापीठाला सहकार्य करण्याऐवजी नेहमीच विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात वृत्त प्रसारित करून विद्यापीठाची नाहक बदनामी करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे विद्यापीठाने म्हटलंय.


सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित 

विद्यापीठाने मागील काही वर्षांत सर्व भागधारकांच्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्यामुळे सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सलग दोन वर्षे फिक्की संस्थेच्या सर्वोत्तम पुरस्काराने विद्यापीठाला गौरविण्यात आले आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराने विद्यापीठास सर्वोत्तम कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटलंय.

विद्यापीठ प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

कोणत्याही विद्यापीठांच्या रँकिंगच्या निकषात पर्सेप्शन यास खूप महत्व असते. विद्यापीठ प्रशासनाने भागधारकांच्या सहकार्याने रँकिग मध्ये उत्तम कामगिरी केली आहे तथा हे पर्सेप्शम सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे असताना मात्रप्रदीप सावंत यांनी सहकार्याची भूमिका न घेता विद्यापीठ प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याना यापूर्वी याबाबत समज देण्यात आली होती. परंतु त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांनी या नोटिसास उत्तर दिले असून विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Aaditya Thackeray