Gold Rate : सोनं चांदीच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 1.02 लाखांवर आला आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दर घसरले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घरसण झाली आहे. सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात 2,300 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. सोन्याचे दर 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्याची घरसण पाहता हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे.
2026 मध्ये सोनं चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2.30 लाख रुपये होता. 29 जानेवारी 2026 रोजी चांदीचा दर 3.86 लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. चांदीचे दर 2.2 लाख रुपयांनी घसरले आहेत. चांदी 114 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा दर 1.33 लाख होता. 29 जानेवारी रोजी तो एक तोळा सोन्याचा दर 1.76 लाखांच्या उच्चांकावर पोहोचला. तेव्हापासून सोने 40,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोनं 30 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
सोमवारी, एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच सोनं चांदीचे दर घसरले. 4 डिसेंबरला मुदत संपणाऱ्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1,36,705 रुपयांवर बंद झाला. संध्याकाळच्या सत्रात सोन्याचा दर 1,35,312 रुपयांपर्यंत घसरला. अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याच्या दरात प्रति औंस 4,025 ते 3,950 डॉलर्सपर्यंत संभाव्य घसरण होऊ शकते. भारतीाय सराफा बाजारात सोन्याचा दर 1 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अमेरिकेने 10 -वर्षीय बॉण्डवरील परतावा (यील्ड) आणखी वाढवला तरच हे घडू शकते.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयावर गोल्डमार्केटटी पुढील स्थिती अवलंबून आहे. 17 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी एफओएमसीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध होणार आहे. याचा सोने आणि चांदीच्या दरांवर थेट परिणाम होणार आहे.
परकीय निधीचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे रुपया 27 पैशांनी मजबूत झाला आहे. रुपया प्रति डॉलर 93.92 वर बंद झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 17 डॉलरने घसरून प्रति औंस 3,869 डॉलरवर आला, तर चांदीचा दरही 3.59% ने घसरून प्रति औंस 47.366 डॉलरवर आला आहे.
गोल्ड मार्केटमध्ये सुरु झालेली ही घरसण दीर्घकाळ राहू शकते यामुळे येत्या काही महिन्यात 2024-2025 यावर्षात असलेल्या दरापर्यंत सोन्याचा दर येवू शकतो. 2024 मध्ये सोन्याचा दर प्रती तोळा 77,913 ते 78,245 रुपयांच्या आपसास होता. तर, 2025 मध्ये एक तोळा सोन्याचा दर 1,01,000 ते 1,36,570 रुपयांच्या दरम्यान होता.