• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'

लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'

जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल तर त्याचा मी निषेध करते, अशी भूमिका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी मांडली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 20:29 IST|Updated: Nov 16, 2026, 20:38 IST
joinshare
लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'
Image Credit: नताशा आव्हाडच्या भूमिकेवर आव्हाडांची प्रतिक्रिया

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सोन्याचा दर 1.02 लाखावर आला;  2024-2025 च्या दरात सोनं मिळणार?

सोन्याचा दर 1.02 लाखावर आला; 2024-2025 च्या दरात सोनं मिळणार?

2

लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'

3

यापुढे भारतीय सैन्यात का नसणार ब्रिगेडियर पद? कसली सुरुय तयारी? मोठी अपडेट!

4

थायलंडमधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ फुकेत येथे मोठी दुर्घटना! एकाचवेळी 11 जणांचा जळून मृत्यू; 36 जण जखमी

5

रोहित पवार यांच्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, भाजपाची मागणी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतभेद आहेत का अशी चर्चा आता सुरु झालीय.. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल तर त्याचा मी निषेध करते, अशी भूमिका त्यांनी एक्सवर पोस्ट करत जाहीर केली. विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे या देशाची आणि संविधानाची मोठी हानी करण्यासारखं आहे, असं नताशा आव्हाड यांनी म्हटलं आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली बाजू मांडील आहे.

मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी नुकतीच सकारात्मक भूमिका मांडली. मात्र आता या मुद्द्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीतच पक्षांतर्गत विविध मतप्रवाह समोर आलेत. या विधेयकाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांनी अद्याप काहीही भूमिका मांडलेली नाही. मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "शरद पवारांनी एकदा सागितलं की ती लक्ष्मणरेषा अशी माझी भूमिका असते. नवीन पिढी आहे त्यांना काय बोलणार. माझ्यासाठी शरद पवार म्हणतील ती पूर्व दिशा असते. ती लंडनमध्ये आहे, ती येईल तेव्हा तिच्याशी बोलेन. डीलिमिटेशन आल्यापासून पवार साहेबांचा पाठिंबा आहे. साहेबांनी एकदा निर्णय घेतला की झालं".

डिलिमिटेशन विधेयकाबाबत नताशा आव्हाडांनी काय म्हटलंय? 

माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणा-या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे. या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!

 

माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!

— Natasha Awhad (@NatashaASpeaks) November 15, 2026

 

राऊतांची रिपोस्ट, वडेट्टीवारांच्या लेकीचं समर्थन

खासदार संजय राऊत यांनी नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. नताशा आव्हाड यांची पोस्ट रिपोस्ट करत राऊतांनी मराठी बाणा असा शब्द वापरला आहे. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी देखील नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नताशा यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा  व्यक्त केली. तसेच, आता कुठल्याही पक्षाने पक्षातील तरुण नेते आणि जेन-झी यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सूचक इशाराही शिवानी वडेट्टीवार यांनी दिला आहे.

एकीकडे विलीनीकरणासह शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड आपल्याला लेकीला समजावतील असं वक्तव्य शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलं आहे. इतकच नव्हे तर त्यांनी आव्हाडांच्या मंत्रिपदाची चर्चा असल्याचं दावाही केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jitendra Awhad
Sharad Pawar
Supriya Sule