• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /यापुढे भारतीय सैन्यात का नसणार ब्रिगेडियर पद? कसली सुरुय तयारी? मोठी अपडेट!

यापुढे भारतीय सैन्यात का नसणार ब्रिगेडियर पद? कसली सुरुय तयारी? मोठी अपडेट!

भारतीय लष्करात ब्रिगेडियर पद रद्द करण्याचा प्रस्ताव? कर्नलला थेट मेजर जनरल पदावर बढती देण्याच्या चर्चेमागचे कारण आणि नौदल-हवाई दलावरील संभाव्य परिणाम जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 16, 2026, 20:15 IST|Updated: Nov 16, 2026, 20:33 IST
joinshare
यापुढे भारतीय सैन्यात का नसणार ब्रिगेडियर पद? कसली सुरुय तयारी? मोठी अपडेट!
Image Credit: ब्रिगेडीयर पद

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'

लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'

2

यापुढे भारतीय सैन्यात का नसणार ब्रिगेडियर पद? कसली सुरुय तयारी? मोठी अपडेट!

3

थायलंडमधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ फुकेत येथे मोठी दुर्घटना! एकाचवेळी 11 जणांचा जळून मृत्यू; 36 जण जखमी

4

रोहित पवार यांच्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, भाजपाची मागणी

5

'झी 24 तास'च्या उत्सव बांधिलकीच्या कार्यक्रमानंतर शेतक-यांना मदतीचा ओघ सुरू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतीय लष्कराच्या पदोन्नती व्यवस्थेत मोठा बदल होणारेय. लष्करातील ब्रिगेडियर हे पद रद्द करून कर्नल पदावरील अधिकाऱ्यांना थेट मेजर जनरल पदावर बढती देण्यात येणार आहे. हा बदल प्रत्यक्षात आल्यास यामुळे लष्करी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अधिक सुलभ होऊ शकतो. तसेच नागरी सेवांमधील अधिकाऱ्यांच्या तुलनेत लष्करी अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनस्तर गाठण्यासाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे.

ब्रिगेडियर पद रद्द करण्याचा प्रस्ताव काय?

भारतीय लष्कर ब्रिगेडियर हे पद रद्द करण्याची शिफारस करण्याच्या तयारीत आहे. सध्याची पदोन्नतीची रचना ही कर्नलनंतर ब्रिगेडियर आणि त्यानंतर मेजर जनरल अशी आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्नल पदावरील पात्र अधिकाऱ्यांना थेट मेजर जनरल पदावर बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही शिफारस संरक्षण मंत्रालयामार्फत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे पाठवली जाणार आहे.


प्रमुख कारण काय?

लष्करातील अधिकारी पदांची रचना पिरॅमिडसारखी आहे. कनिष्ठ आणि मध्यम स्तरावर अधिक पदे आहेत; मात्र वरिष्ठ पदांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना पुढील पदावर बढती मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. म्हणजेच मेजर जनरलशी संबंधित वेतनस्तर गाठण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना साधारण 32 ते 33 वर्षे लागतात. त्याच वेतनस्तरावर नागरी सेवांमधील आयएएस, आयपीएस आणि वनसेवेचे अधिकारी 16 ते 18 वर्षांत पोहोचतात. ही तफावत कमी करणे हा प्रस्तावामागील एक उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

2018 मध्येही झाली होती चर्चा

ब्रिगेडियर पद रद्द करण्याची कल्पना नवीन नाही. 2018 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या कार्यकाळात झालेल्या कॅडर अभ्यासातही या शक्यतेवर विचार करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झाला नव्हता. आता ही शिफारस औपचारिकपणे पुढे नेण्याची तयारी झालीय. या महिन्यात किंवा पुढील महिन्यात शिफारस पाठवली जाणार आहे.

ब्रिगेडियरऐवजी मेजर जनरलकडे ब्रिगेडची कमान?

सध्या ब्रिगेडियर सांभाळत असलेली ब्रिगेडची कमान मेजर जनरलकडे दिली जाऊ शकते. मेजर जनरल यांच्याकडे डिव्हिजन स्तरावरील जबाबदाऱ्याही कायम राहतील. नियमित अधिकाऱ्यांसाठी मेजर जनरल हे निवृत्तीच्या वेळी मिळणारे किमान पद ठरविले जाऊ शकते. असे असले करी या बदलामुळे प्रत्यक्ष कमांड व्यवस्था कशी असेल?, हे अंतिम आराखडा स्पष्ट झाल्यानंतरच समजू शकणार आहे.

नौदल आणि हवाई दलावरही परिणाम?

ब्रिगेडियरच्या समकक्ष पदे नौदलात कमोडोर आणि हवाई दलात एअर कमोडोर अशी आहेत. त्यामुळे लष्करातील प्रस्ताव स्वीकारल्यास या दोन्ही दलांच्या पदरचनेवरही परिणाम होऊ शकतो. विद्यमान पदांवरील अधिकाऱ्यांचे समायोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि तिन्ही दलांमधील समन्वय ही अंमलबजावणीतील महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. असे असले तरी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला शिफारसी मिळाल्यानंतर आणि सरकारचा निर्णय झाल्यानंतरच या बदलाचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Army News