• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 16, 2026, 21:40 IST|Updated: Nov 16, 2026, 21:48 IST
joinshare
18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

आदित्य ठाकरेंसह आमदारांना गोडाऊनमध्ये का बसवलं? मुंबई विद्यापीठानं दिलं स्पष्टीकरण!

2

18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

3

सिंहाचा बाईकवरुन पाठलाग करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घडली जन्माची अद्दल, पाहा VIDEO

4

'विराट कोहलीला 10 वर्षांनी पश्चात्ताप होईल!', कपिल देव यांनी का दिला इशारा?

5

सोन्याचा दर 1.02 लाखावर आला; 2024-2025 च्या दरात सोनं मिळणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यपाल हरिभाऊ बागडे : सध्या देशभरात NEET-JEE परीक्षेवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.  नीट आणि जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांचा हवाला देत तयांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अलवर जिल्ह्यातील अंदाजे 18,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या, परंतु त्यापैकी फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. 

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीत राज्यपालांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा स्तर सुधारण्याची गरज आहे. शिक्षणातील यश केवळ विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण करण्यापुरते मर्यादित नाही. मुलांमध्ये बौद्धिक क्षमता, विवेकबुद्धी आणि तार्किक विचारशक्ती विकसित करणे हेदेखील महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. 

मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची नैसर्गिक जिज्ञासा असते. मुलांच्या या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ही शिक्षकांची जबाबदारी आहे. फक्त उत्तीर्ण होणे हे शिक्षणाचे ध्येय नसावे. शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांना नीट-जेईई, आरपीएससी आणि यूपीएससी यांसारख्या आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी तयार करुन घेणे गरजेचे आहे.

पदवी असली तरी तररुण आरपीएससी-यूपीएससीसाठी पात्र का होत नाहीत?

विद्यार्थी पदवी मिळवतात पण ते आरपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक नसतात. यावरुनच पदवी मिळवणे आणि प्रत्यक्ष शैक्षणिक क्षमता यांच्यातील फरक दिसून येतो. शिक्षणाची वास्तविक स्थिती समजून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांमधील प्रतिभा विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Religion News