SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

मराठवाड्यात यावर्षी भीषण दुष्काळात संकट समोर आला आहे हिंगोली जिल्ह्यात पाण्याअभावी नद्यांची पात्र कोरडी ठाक पडल्याचं चित्र दिसून येत आहे

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 01, 2026, 03:07 PM IST | Updated: Nov 01, 2026, 03:08 PM IST
Image Credit: hingoli draught
Join

कधीकाळी खळाळून वाहणाऱ्या नद्या, शेकडो एकर शेती हिरवीगार करणारी पाणवठे आणि हजारो गावकऱ्यांची तहान भागवणारे जीवनस्रोत आज अक्षरश वाळवंट बनले आहेत. मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट अधिकच गडद झालं असून, हिंगोली जिल्ह्यातून समोर आलेली दृश्ये काळजाचा ठोका चुकवणारी आहेत.

थेट ड्रोनच्या कॅमेऱ्यातून समोर आलेल्या या विदारक दृश्यात, मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणारी ऐतिहासिक पैनगंगा नदी आज पाण्याचा एक थेंबही शिल्लक न ठेवता पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ म्हणजेच 1972 च्या ऐतिहासिक दुष्काळानंतर पहिल्यांदाच पैनगंगा नदीची ही दुर्दशा झाली आहे.

केवळ पैनगंगाच नव्हे, तर कयाधू आणि पूर्णा नदीचीही हीच गत झाली आहे शेकडो बळीराजांसमोर आता जगायचं कसं, हा प्रश्न उभा ठाकलाय. पावसाने दडी मारल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे, विहिरी-बोरवेल्स आटल्या आहेत आणि उभं सोयाबीन-हळदीचं पीक डोळ्यांसमोर करपून गेलं आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा हा प्रश्न किती भीषण होणार?

ही दृश्यं आहेत मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या ऐतिहासिक पैनगंगा नदीची. कधी काळी पाण्याच्या खळाळाटाने आणि जीवनदायी प्रवाहाने दुथडी भरून वाहणारी ही नदी आज अक्षरशः वाळवंट बनली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव परिसरासह संपूर्ण नदीपात्रात आज पाण्याचा एक थेंबही उरलेला नाही. पावसाने मारलेल्या दडीमुळे ही अत्यंत विदारक आणि हदयद्रावक परिस्थिती ओढवली आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, तब्बल 50 वर्षांहून अधिक काळानंतर म्हणजेच 1972 च्या ऐतिहासिक दुष्काळानंतर पहिल्यांदाच पैनगंगा नदी एवढी भीषण कोरडी पडली आहे.

 दरवर्षी याच नदीच्या पाण्यावर हजारो एकर शेती बहरत होती, परिसरातील गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळत होतं मात्र आज हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील संपूर्ण परिसर पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे.हिंगोलीच्या पळशी येथील शेतकरी किसन बांगर यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, मागील अडीच महिन्यांत हिंगोलीत पावसाचा एक थेंबही पडला नाही, त्यामुळे उभं सोयाबीन करपून गेलं. हळदीच्या पिकावर नुकसान भरून निघेल ही त्यांची शेवटची आशाही या भीषण दुष्काळानं मातीमोल केली. परिसरातील सर्व विहिरी, कूपनलिका आणि पाण्याचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES