• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत

न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेच्या पाचव्या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, पण पहिल्या तीन सामन्यातील विजयामुळे भारताने ही मालिका नावावर केली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 01, 2026, 04:17 PM IST|Updated: Nov 01, 2026, 04:48 PM IST
joinshare
न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
24 आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात वेगळा गट; भारतातील आणखी एका राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप?

24 आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात वेगळा गट; भारतातील आणखी एका राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप?

2

संजय गुप्ता यांच्या अंत्यसंस्कारावेळी लेकीचे कॅमेऱ्यासमोर अश्लिल हावभाव! VIDEO व्हायरल

3

'ज्ञानेश कुमारशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते', राहुल गांधींचा गंभीर आरोप

4

न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत

5

बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारताच्या संघाने 3-2 अशी मालिका नावावर केली. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आधीच अभेद्य आघाडी घेतली होती. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला न्यूझीलंडने पराभूत केले पण ते मालिकेमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरले. झालेल्या मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये किवी संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला, या सामन्यात आणखी एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात वाचा. 

न्यूझीलंडने अंतिम सामना जिंकला असेल, पण या मालिकेत त्यांनी स्वतःचीच फजिती करून घेतली. क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा न्यूझीलंडच्या संघाची या मालिकेमध्ये फिल्डिंग फार खराब राहिली आहे. संपूर्ण मालिकेत त्यांचे क्षेत्ररक्षण भारतापेक्षाही वाईट होते. यावरून हे लक्षात येते की, किवी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 15 झेल सोडले, जो त्यांच्यासाठी एक लाजिरवाणा विक्रम मानला जाईल. याचे कारण म्हणजे न्यूझीलंडचा संघ आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि झेल घेण्यासाठी ओळखला जातो. कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत किवी संघाने सोडलेले हे सर्वाधिक झेल आहेत.

हे ही वाचा

इशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, सूर्यकुमार यादवचा मोडला रेकॅार्ड!

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने हे लक्ष्य 18 ओव्हरमध्ये पूर्ण केले यामध्ये टीम साईफर्ट आणि ग्लेन फिल्प्सस यांनी संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारतासाठी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने संघासाठी अर्धशतक झळकावले तर इशान किशनने देखील 61 धावांची खेळी खेळली. 

That winning feeling  #TeamIndia Captain Shreyas Iyer @ShreyasIyer15 receives the #NZvIND T20I Series winner's trophy from the High Commissioner of India to New Zealand, Her Excellency Ms Maunpuii Saiawi @MuanpuiiSaiawi  @IndiainNZ https://t.co/2mBXgXXnI9

— BCCI (@BCCI) November 1, 2026

सामना संपवणाऱ्या नमन धीरने 23 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने 17 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. परिणामी, भारतीय संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 191 धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने 4 बळी घेतले. नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. जेकब डफी आणि मिचेल सँटनर यांनीही चांगली गोलंदाजी केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Sports News