भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. इशान किशनच्या खेळीनंतर त्याने आता नवा रेकॅार्ड त्याच्या नावावर केला आहे.
इशान किशनने कोणता रेकॅार्ड नावावर केला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
1/8
न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले
न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावताना इशानने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. चेंडूंच्या संख्येनुसार, भारतासाठी सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
इशान किशनची 190.63 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी
190.63 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना किशनने पाच चौकार आणि पाच षटकार मारले. या खेळीमुळे, किशनने एका वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा सूर्यकुमार यादवला मागे टाकले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
पाचव्या टी20 सामन्यात 32 चेंडूंमध्ये शानदार 61 धावा
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात इशान किशनने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 32 चेंडूंमध्ये शानदार 61 धावा केल्या, त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
ईशानच्या आधी, भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्याच्या नावावर होता. 2022 मध्ये, सूर्याने 31 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या होत्या, ज्यात नऊ अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला
न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या खेळीनंतर आता इशान किशनने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला आणि भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा
2026 मध्ये भारतासाठी सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये किशनचा समावेश आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 61 धावांची शानदार खेळी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
इशान किशनची ऐतिहासिक कामगिरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्यात ईशान किशनने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इतिहास रचला. 2026 मध्ये किशनची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने प्रत्येक मालिकेत सातत्याने धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
इशान किशनच्या 2000 धावा
ईशानने 1345 चेंडूंमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. सर्वात जलद 200 धावा करण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम केवळ 1024 चेंडूंमध्ये केला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया