• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्याच्या सुरुवातीला हेड कोच गौतम गंभीरला विचारण्यात आलं की एवढ्या मोठ्या संघाला मॅनेज आणि सर्व खेळाडूंना खुश कसे ठेवतो? यावर त्याने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 01, 2026, 02:38 PM IST|Updated: Nov 01, 2026, 03:17 PM IST
joinshare
'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?
Image Credit: 'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

2

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

3

'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

4

550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

5

आजपासून बदललाय मोबाईल कॉलिंगसंदर्भातील नियम, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामान्यांची टी20 सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजमधील शेवटचा पाचवा सामना हा 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या पहिल्या तीन सामन्यात भारताने तर चौथ्या सामना हा न्यूझीलंडने जिंकला. पाचव्या सामन्याच्या सुरुवातीला भारताचा हेड कोच असणाऱ्या गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला की तो एवढ्या मोठ्या संघाला मॅनेज आणि सर्व खेळाडूंना खुश कसे ठेवतो? यावर गौतम गंभीरने अगदी थेट उत्तर दिलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर?

हेड कोच गौतम गंभीरने प्रश्नाच उत्तर देताना म्हटलंन की, 'आधी सांगायचं तर माझं काम हे सर्वांना खुश ठेवणं नाहीये. माझे काम योग्य निर्णय घेणे हे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नव्हे. म्हणूनच मी इथे आहे. मला असं वाटतं की, सोशल मीडियाच्या या युगात, जिथे खूप जास्त चर्चा होत असते, तिथे लोकप्रिय निर्णय घेणे अत्यंत सोपं असतं'.

गौतम गंभीरचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा वैभव सूर्यवंशीला प्लेईंग 11 चा नियमित खेळाडू बनवण्याची मागणी होत होती. मात्र मॅनेजमेंटने सांगितलंय की वैभवला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल. याचे कारण असे की भारतीय ओपनर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान चौथ्या टी20 सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवण्याचा अचानक घेतलेला निर्णयही चर्चेचा विषय ठरलाय.

हेही वाचा : 'मी तुला माझ्या पत्नी सोबत...', LIVE मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर, Video Viral

खासकरून टी20 संघात असं पाहायला मिळतंय की फलंदाजीच्या ऑर्डरमध्ये लागोपाठ बदल होत आहेत. ईशान किशन पासून ते अक्षर पटेल आणि तिलक वर्मा सुद्धा कधी वरच्या क्रमांकावर तर कधी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतात. याचा परिणाम हा लयीवर सुद्धा होतोय. वैभव सूर्यवंशीला या सीरिजमध्ये दोनद संधी मिळाली. दुसऱ्या टी20  सामन्यात तो केवळ 4 धावा काढून बाद झाला. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने 19 बॉलमध्ये 45 धावांची धडाकेबाज खेळी करत भारतीय संघाला एक उत्कृष्ट सुरुवात करून दिली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Marathi News
Cricket News
Gautam Gambhir