SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'बाबा आम्ही मरुन जाऊ,' मुलांना जायकवाडी धरणात फेकून मारणाऱ्या आरोपी बापाबद्दल धक्कादायक खुलासा! पत्नीच्या दाव्यामुळे प्रकरणाला भलतंच वळण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात फेकलेल्या दोन्ही चिमुकल्याचे मृतदेह अखेर 3 दिवसांनी सापडले आहेत,

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 19, 2026, 19:34 IST | Updated: Nov 19, 2026, 19:45 IST
Image Credit: मुलांना जायकवाडी धरणात फेकून मारणाऱ्या आरोपी बापाबद्दल धक्कादायक खुलासा
Join

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात फेकलेल्या दोन्ही चिमुकल्याचे मृतदेह अखेर 3 दिवसांनी सापडले आहेत, या दोन्ही लहानग्यांना त्यांच्या वडिलांनी कालव्यात फेकले असल्याचं पुढं आलं आहे. आईच्या फिर्यादीवरून बापविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे बापाला मुलं आवडत नव्हती त्यातून घरात नेहमी वाद होते. त्यातूनच हे कृत्य घडल्याचं आता पोलीस तपासात पुढं आलं आहे. या घटनेत 7 आणि 5 वर्षांच्या या 2 मुलांचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. पैठणच्या नांदर गावात दुर्देवी घटना घडली आहे.

आयुष आणि श्याम ही 2 मुलं हे जग कळण्याअधीच या जगाला सोडून गेली आहेत.  ज्या बापाचे बोट धरून जग पाहण्याची यांची इच्छा असेल त्याच बापाने बोट धरून याना मृत्यूच्या दारात फेकून दिलं आहे. सोमवारी वडा पाव आणि कोल्ड ड्रिंक घेऊन देतो म्हणून आरोपी बाप परमेश्वर रोडगे आपल्या 2 लहान मुलांना बाहेर घेऊन गेला. वडापाव आणि कोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर कालव्याच्या बाजूला जाऊन खाऊ हे स्वप्न दाखवत त्या मुलांना काळव्याजवळ घेऊन आला.

7 वर्षाच्या मुलाला काळव्याजवळ आल्यावर भीती वाटली. बाबा भीती वाटतेय पाण्यात पडलो तर मरून जाऊ असे तो सांगत होता असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. मात्र तरीही परमेश्वरने दोन्ही मुलांना हात धरून जवळ घेतले आणि कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी मारली. यानंतर थोड्या वेळाने आरोपी बाप बाहेर आला मात्र मुलं वाहून गेली. यातील एक मुलाचा मृतदेह बुधवारी रात्री सापडला तर दुसऱ्याचा गुरुवारी सापडला.

घरात आमच्यात वाद होत होते. त्यातून परमेश्वरला मुलं आवडत नव्हती म्हणून त्याने हा प्रकार केल्याचा बायकोने आरोप केला आहे. यानंतर परमेश्वर रोडगे वर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे या नराधम बापाने आधी मुलं वाहून गेल्याचा बनाव केला मात्र पोलिसांना, नातेवाईकांना संशय आला आणि पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड झाले.

'पप्पांसोबत जाऊ नको'

पप्पांसोबत जाऊ नको, असे सात वर्षाचा आरुष आपल्या लहान भावाला सांगत होता. मात्र, वडापाव खाण्याची इच्छा आणि नवीन स्कूटीचे आकर्षण यामुळे पाच वर्षाचा कार्तिक वडिलांकडे गेला. ''तुलाही वडापाव देतो, तू ये'', असे म्हणत वडिलांनी आरुषलाही सोबत नेले. त्यानंतर दोन्ही मुलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात घेऊन उडी मारली आणि वाहत्या पाण्यात सोडून स्वतः पोहत बाहेर आला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES