)
Maharashtra Breaking News Today LIVE: ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम मुंबईत, सचिन तेंडुलकर आणि स्थानिक तरुणांसोबत गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला
ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन तीन दिवसीय भारत दौ-यावर आलेत.. प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन मुंबईत दाखल झालेत.. यावेळी मुंबईतील बॅलार्ड इस्टेट इथं भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि स्थानिक तरुणांसोबत प्रिन्स विलियम यांनी 'गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला... यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये जेव्हा हे शाही जोडपे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाही त्यांनी मुंबईच्या ओव्हल मैदानावर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेले केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हात्रे मागील तीन महिन्यांपासून आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणात म्हात्रे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज यापूर्वी मागे घेण्यात आला होता. आता या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या परिचारिका आणि मदतनीस यांची साक्ष पूर्ण झाल्याने म्हात्रे यांच्या वतीने पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शनिवारी म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७३ वर्षीय म्हात्रे यांची एक किडनी निकामी झाली आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांनी दुष्काळात पशुपक्ष्यांच्या अन्नासाठी आपल्या शेतातील एक एकर बाजरीचं पीक राखून ठेवलं आहेत.. गेल्या तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत असून, त्यांच्या या भूतदयेचं सर्वत्र कौतुक होत आहे..
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निकालाचा थरार सुरू असून आतापर्यंत १५ पैकी 10 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत... यामध्ये सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर परिवर्तन पॅनलला ३ जागांवर विजय मिळालाय... धीरज देशमुख यांनीही दणदणीत विजय मिळवलाय... त्यांना १५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भारत चामले यांना अवघी २ मते मिळाली... दुसरीकडे निलंगा मतदारसंघात अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवत चुलती संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केलाय... उदगीरमध्ये प्रीती भोसले यांनी विजय मिळवलाय, तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांनी बाजी मारलीय... दरम्यान, निकालाच्या आकडेवारीत सहकार पॅनल आघाडीवर असलं तरी उर्वरित निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलंय... जिल्हा बँकेवर नेमकं कोणाचं वर्चस्व राहणार, याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे..
साता-यातील तारळी धरणावर सुरू असलेल्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.... या प्रकल्पात खर्च कमी दाखवून फसवणूक करण्यात आली असून, उत्खनन, वृक्षतोड आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अदानी ग्रुपविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दुसरीकडे, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित असलेले 23 पंप स्टोरेज प्रकल्प हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार प्रसिद्ध व्याख्याते विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केला. तारळी धरणाच्या पायथ्याशी आयोजित प्रकल्प हटाव सभेत दोघांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली...
देशातील आरोग्यावरील सरकारी खर्चात तीनपट वाढ...नागरिकांचा खिशातून होणारा खर्च घटला....आरोग्यासाठी सरकारी खर्च 4 लाख कोटींवर ...सरकारी खर्चातील वाटा 10 वर्षांत 14 टक्क्यांनी वाढला..
टायगर श्रॉफ गोळीबा प्रकरणी एका आरोपीला अटक...आरोपीकडून बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त ..अन्य तीन जण पोलिसांना चकवा देत पसार
कट्टर हिंदुत्व विचारांवर परतणा-यांचं स्वागत...केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य....'काही नेत्यांची मूळ विचारसरणीपासून फारकत'...दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण...
.प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी, स्थानिक आक्रमक...खर्च कमी दाखवून फसवणूक केल्याचा सयाजी शिंदेंचा आरोप...तर प्रकल्प हटवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
टोरंटविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता..रस्त्याच्या जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय..रस्त्यासाठी 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी..5 गावांतील 226 शेतकऱ्यांना नोटीस ...
भारत समिटमधील इटलीच्या नेत्याच्या घोषणाबाजीवरून भाजप आक्रमक, देशाची बदनामी करून सत्ता मिळणार नाही… पुण्यातून अमित शाहांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर घणाघात…
आमदार रोहित पवारांची आज मुंबईत पत्रकार परिषद…अजितदादांच्या अपघात, घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण याचा गौप्यस्फोट करणार…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 november 2026 : गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. अजितदादांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? असा सवाल करत पोस्टरवर मफलरचे चित्र,पोस्टरवर न दिसणारा मफलर मॅन कोण? उद्या पत्रकार परिषदेत याचा खुलासा होणार का? असे सवाल सध्या उपस्थित होत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासारख्या अन्य महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.