Maharashtra Breaking News Today LIVE : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम मुंबईत
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 november 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 november 2026 : गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. अजितदादांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? असा सवाल करत पोस्टरवर मफलरचे चित्र,पोस्टरवर न दिसणारा मफलर मॅन कोण? उद्या पत्रकार परिषदेत याचा खुलासा होणार का? असे सवाल सध्या उपस्थित होत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासारख्या अन्य महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.
आर्वीच्या सामान्य रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहेय... अपघातग्रस्ताच्या हाताला प्लास्टर लावताना चक्क कागदी पुठ्ठा लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहेय... सावळापूर परिसरात ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने काही जण गंभीर जखमी झाले होतेय... त्यांना उपचारासाठी आर्वीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मात्र, तिथे झालेल्या उपचारांच्या पद्धतीमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेय... रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांची दुरवस्था आणि आता रुग्णालयातील उपचारांची ही अवस्था आहे..या धक्कादायक प्रकाराची आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का, हा सवाल उपस्थित होत आहेय.
संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता ....महिला आरक्षण, डिलिमिटेशन विधेयकावर लक्ष....सूत्रांची माहिती
16 Nov 2026 11:24 IST
Maharashtra Breaking News Today LIVE: मुंबई महापालिकेवर थकबाकीचा डोंगर
मुंबई महापालिकेवर थकबाकीचा डोंगर... होर्डिंग, मोबाईल कंपन्यांकडे 233 कोटी थकीत... 10 ते 15 वर्षांपासून थकबाकी कायम
16 Nov 2026 11:23 IST
Maharashtra Breaking News Today LIVE: लातूर जिल्हा बँकेत देशमुखांचं वर्चस्व कायम
लातूर जिल्हा बँकेत देशमुखांचं वर्चस्व कायम... धीरज देशमुखांसह सहकार पॅनलचे 7 उमेदवार विजयी... संभाजी निलंगेकरांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागा...
16 Nov 2026 10:44 IST
LIVE: ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम मुंबईत, सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटचा आनंद घेतला
Maharashtra Breaking News Today LIVE: ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम मुंबईत, सचिन तेंडुलकर आणि स्थानिक तरुणांसोबत गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला
ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन तीन दिवसीय भारत दौ-यावर आलेत.. प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन मुंबईत दाखल झालेत.. यावेळी मुंबईतील बॅलार्ड इस्टेट इथं भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि स्थानिक तरुणांसोबत प्रिन्स विलियम यांनी 'गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला... यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये जेव्हा हे शाही जोडपे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाही त्यांनी मुंबईच्या ओव्हल मैदानावर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेले केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हात्रे मागील तीन महिन्यांपासून आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणात म्हात्रे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज यापूर्वी मागे घेण्यात आला होता. आता या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या परिचारिका आणि मदतनीस यांची साक्ष पूर्ण झाल्याने म्हात्रे यांच्या वतीने पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शनिवारी म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७३ वर्षीय म्हात्रे यांची एक किडनी निकामी झाली आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांनी दुष्काळात पशुपक्ष्यांच्या अन्नासाठी आपल्या शेतातील एक एकर बाजरीचं पीक राखून ठेवलं आहेत.. गेल्या तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत असून, त्यांच्या या भूतदयेचं सर्वत्र कौतुक होत आहे..
16 Nov 2026 10:32 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : लातूर जिल्हा बँकेत देशमुखांचं वर्चस्व कायम
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निकालाचा थरार सुरू असून आतापर्यंत १५ पैकी 10 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत... यामध्ये सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर परिवर्तन पॅनलला ३ जागांवर विजय मिळालाय... धीरज देशमुख यांनीही दणदणीत विजय मिळवलाय... त्यांना १५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भारत चामले यांना अवघी २ मते मिळाली... दुसरीकडे निलंगा मतदारसंघात अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवत चुलती संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केलाय... उदगीरमध्ये प्रीती भोसले यांनी विजय मिळवलाय, तर लातूर मतदारसंघात हेमंत जाधव यांनी बाजी मारलीय... दरम्यान, निकालाच्या आकडेवारीत सहकार पॅनल आघाडीवर असलं तरी उर्वरित निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलंय... जिल्हा बँकेवर नेमकं कोणाचं वर्चस्व राहणार, याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे..
16 Nov 2026 10:31 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : साता-यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्प वादात
साता-यातील तारळी धरणावर सुरू असलेल्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.... या प्रकल्पात खर्च कमी दाखवून फसवणूक करण्यात आली असून, उत्खनन, वृक्षतोड आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अदानी ग्रुपविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दुसरीकडे, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित असलेले 23 पंप स्टोरेज प्रकल्प हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार प्रसिद्ध व्याख्याते विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केला. तारळी धरणाच्या पायथ्याशी आयोजित प्रकल्प हटाव सभेत दोघांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली...
16 Nov 2026 10:30 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : देशातील आरोग्यावरील सरकारी खर्चात तीनपट वाढ
देशातील आरोग्यावरील सरकारी खर्चात तीनपट वाढ...नागरिकांचा खिशातून होणारा खर्च घटला....आरोग्यासाठी सरकारी खर्च 4 लाख कोटींवर ...सरकारी खर्चातील वाटा 10 वर्षांत 14 टक्क्यांनी वाढला..
16 Nov 2026 10:30 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : टायगर श्रॉफ गोळीबा प्रकरणी एका आरोपीला अटक
टायगर श्रॉफ गोळीबा प्रकरणी एका आरोपीला अटक...आरोपीकडून बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त ..अन्य तीन जण पोलिसांना चकवा देत पसार
कट्टर हिंदुत्व विचारांवर परतणा-यांचं स्वागत...केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य....'काही नेत्यांची मूळ विचारसरणीपासून फारकत'...दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण...
16 Nov 2026 10:29 IST
Maharashtra Breaking News Today LIVE :साता-यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्प वादात
.प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी, स्थानिक आक्रमक...खर्च कमी दाखवून फसवणूक केल्याचा सयाजी शिंदेंचा आरोप...तर प्रकल्प हटवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
16 Nov 2026 10:28 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : टोरंटविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
टोरंटविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता..रस्त्याच्या जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय..रस्त्यासाठी 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी..5 गावांतील 226 शेतकऱ्यांना नोटीस ...
16 Nov 2026 10:28 IST
Maharashtra Breaking News Today LIVE : भारत समिटमधील इटलीच्या नेत्याच्या घोषणाबाजीवरून भाजप आक्रमक
भारत समिटमधील इटलीच्या नेत्याच्या घोषणाबाजीवरून भाजप आक्रमक, देशाची बदनामी करून सत्ता मिळणार नाही… पुण्यातून अमित शाहांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर घणाघात…
16 Nov 2026 10:26 IST
LIVE : मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवार कोणता गौप्यस्फोट करणार?
आमदार रोहित पवारांची आज मुंबईत पत्रकार परिषद…अजितदादांच्या अपघात, घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण याचा गौप्यस्फोट करणार…
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे. गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या. मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.