Maharashtra Breaking News Today LIVE Updates 1 november 2026: '... हे खपवून घेतलं जाणार नाही', एकनाथ शिंदेंचा इशारा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 1 november 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 1 november 2026 : निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य महारॅली आयोजित करण्यात आली आहे. तर एकीकडे कॉंग्रेसला प्रत्युत्तर म्हणून देशभरात भाजपाच्या वतीने पदयात्रा/मोर्चे आयोजित आहेत. ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रा- या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि गणेश नाईक सहभागी होणार आहेत. राज्यासह देशभरातील घडामोडी जाणून घेऊयात लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
01 Nov 2026, 11:30 AM
'... हे खपवून घेतलं जाणार नाही', एकनाथ शिंदेंचा इशारा
विरोधकांचा खरा चेहरा, बुरखा फाडला पाहिजे. आणीबाणी आहे म्हणता. इंदिरा गांधीनी आणीबाणी लावली तेव्हा नेते जेलमध्ये होते. मीडिया जेलमध्ये होते. आता असं काही आहे का? सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. इतिहासात कधी असं झालं नाही. हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
01 Nov 2026, 11:10 AM
मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यास सांगणारः शरद पवार
माढा मतदारसंघात 110 टँकर चालू आहेत. बीड उस्मानाबाद जिल्ह्यात पुढे एक दोन दिवसात बाकीची गावे कव्हर करून शेतकऱ्यांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सांगणार, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
01 Nov 2026, 11:00 AM
मोदींना बदनाम करण्याचा विरोधकांचा डावः एकनाथ शिंदे
विरोधकांचा बुरखा फाडला पाहिजे, मोदींना बदनाम करण्याचा विरोधकांचा डावः एकनाथ शिंदे
01 Nov 2026, 10:44 AM
विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजप मैदानात, ठाण्यात 'लोकतंत्र बचाव' पदयात्रा
विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजप मैदानात. पाचपाखाडी ते तलावपाली दरम्यान पदयात्रा सुरू केली असून मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, रवींद्र चव्हाण उपस्थित आहेत.
ही पदयात्रा पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन येथून निघून चंदनवाडी, अलमेडा चौक आणि दगडी शाळा मार्गे तलावपाळी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ समाप्त होईल...मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय..
01 Nov 2026, 10:37 AM
शरद पवारांचा आजपासून दुष्काळी दौरा, तुळशी गावातील ग्रामस्थांशी साधणार संवाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात आज सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता माढा तालुक्यातील वरवडे तुळशी परिसरात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष ऊस इतर पिकांची पाहणी शरद पवार करणार आहेत. यानंतर माढा तालुक्यातील पाण्याच्या समस्यामुळे विकण्यासाठी काढलेलं तुळशी गावातील ग्रामस्थांशी शरद पवार संवाद साधणार आहेत.
या गावांमध्ये पाण्याच्या काय अडचणी आहेत कशामुळे पाणी आलं नाही. या पद्धतीचा संवाद ते ग्रामस्थांशी साधणार आहेत यानंतर पुढील दौऱ्यासाठी शरद पवार मार्गस्थ होणार आहेत
01 Nov 2026, 10:07 AM
तुम्ही जे केलत ते देश कधी विसरणार नाही, राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर हल्लोबाल
13.3 कोटी मतदार वगळण्यात आले.. म्हणजे 7 भारतीयांपैकी 1 मतदार वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय... ज्ञानेश कुमार संस्थेच्या मागे लपून बसले असून ते कायमचे सुटू शकत नाही, असं म्हणत राहुल गांधींनी इशारा दिलाय... ज्ञानेश कुमारांना वाटत असले मोदी-शाह वाचवतील, पण हा त्यांचा भ्रम आहे... तुम्ही जे केलत ते देश कधी विसरणार नाही, असं म्हणत राहुल गांधींनी ज्ञानेश कुमारांवर निशाणा साधलाय...
01 Nov 2026, 10:06 AM
'राजेंद्र, मीनाक्षी शिंदेंना अटक करा'; राम पूर्णेकरांनी घेतली फडणवीसांची भेट
पूर्णेकर हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळणार. मारेकरी यांना सरकार पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना दिले असल्याचे समजते. आता पर्यंत एसआयटी पथक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांच्या वतीने 5 आरोपी यांना अटक केली आहे. आरोपी न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये पुरवणी जबाबा मधे शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे असून मुख्य आरोपी म्हणून आतापर्यंत एसआयटी पथकाने अटक का नाही केली असा सवाल राम पुर्णेकर यांनी मुख्यमंत्री यांच्या समोर उपस्थित केला आहे.
01 Nov 2026, 10:03 AM
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, राम पूर्णेकरांनी घेतली फडणवीसांची भेट- सूत्र
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
राम पूर्णेकरांनी घेतली फडणवीसांची भेट- सूत्र
'राजेंद्र, मीनाक्षी शिंदेंना अटक करा'
राम पूर्णेकरांची फडणवीसांकडे मागणी- सूत्र
01 Nov 2026, 10:01 AM
विरोधी पक्ष हा विरोधी नव्हे, तर ‘अवरोधी पक्ष; मोदींची विरोधकांवर टीका
ऊर्जा संकटाच्या काळात देशाविरोधात कटकारस्थाने करणा-या शक्ती सक्रिय…. विरोधी पक्ष हा विरोधी नव्हे, तर ‘अवरोधी पक्ष… भारताविरोधात परदेशात गुप्त गाठीभेटी… मोदींची विरोधकांवर टीका…
01 Nov 2026, 10:00 AM
'रॅलीला या, स्थानिक व्यापा-यांकडून थोडी खरेदी करा'
रॅलीला या, स्थानिक व्यापा-यांकडून थोडी खरेदी करा... राहुल गांधींचं कार्यकर्त्यांना आवाहन... रॅलीमुळे व्यपाऱ्यांना फायदा होईल... राहुल गांधींचं विधान..
01 Nov 2026, 9:59 AM
रविवार ठरणार रॅली, मोर्चाचा राजकीय 'सुपर संडे'
रविवार ठरणार रॅली, मोर्चाचा राजकीय 'सुपर संडे'...दिल्लीत इंडिया आघाडीची व्होट बचाव, देश बचाव महारॅली...तर विरोधकांच्या आंदोलनाला भाजप पदयात्रेतून उत्तर देणार..
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे. गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या. मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.