)
मालेगाव तालुक्यातील मालेगाव कुसुंबा रोडवर टिंगरि वणपट फाट्याजवळ पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील धुळे चिंचगाव येथील राहणारे राजेद्र नाना माने वय वर्ष 45 , भठा बाई राजेंद्र माने - वय 18 व बालाबाई राजेंद्र माने - वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला. मयत तिघांना शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात आणले असून घटनेची तीव्रता बघता मंत्री दादा भुसे यांनी तिथे भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. काही कार्यक्रमा निमित्त ते नांदगाव येथे गेल्याचे समजते तिकडून परतत असताना हा अपघात झाला. मात्र आई वडील आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंजली दमानिया यांचा भाजपवर हल्लाबोल
पदवीधर निकालावरून दमानियांनी डिवचलं
पदवीधर, शिक्षक निकालानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलीय.. महायुती म्हणून आत्मचिंतन करणार का असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. पाच जागा जिंकण्याची क्षमता असताना 2 वर का थांबलो असं उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटलंय...
ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी SP पक्ष करणार होते आंदोलन.. आंदोलनात आदित्य ठाकरे राज ठाकरे अनिल परब जितेंद्र आव्हाड केदार दिघे राजन विचारे राहणार होते उपस्थित. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर अखेर सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन मागे घेत.. ठाणे रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेणार आहेत...
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची अध्यक्षपद निवडीसाठी थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे.. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळच्या अटीतटीच्या निवडणुकीत सतेज पाटील समविचारी पॅनलने 25 पैकी 13 जागा मिळवीत गोकुळ मध्ये सत्तांतर घडवले. तर महायुतीकडे 12 संचालक आहेत... समविचारी पॅनलचे शशिकांत पाटील चुयेकर हे सहज अध्यक्ष होणार हे नक्की मानले जात होत. मात्र सहकार कायद्यानुसार अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 14 संचालकांचे कोरम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातच गोकुळचे महायुतीचे संचालक अद्याप गोव्यात आहेत.. त्यामुळे हे संचालक आजच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.. आजची सभा कोरम अभावी तहकूब होण्याची देखील शक्यता वर्तवली जातेय.. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय..
माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार, पावसाळी सुट्टीनंतर माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत...
केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना दिवाळी भेट.. महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ.. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय.. 1 जुलै 2026पासून वाढ लागू होणार...
ऊस दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी आक्रमक..सांगलीत ठिकठिकाणी स्वाभिमानीची आंदोलनं.. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले..
गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाची आज निवड…समविचारीकडे कोरम पूर्ण करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने पेच वाढला…महायुतीचे संचालक उपस्थित राहणार का याकडे लक्ष…
पूर्णेकर हत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री शिंदेंवर होणा-या आरोपांनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय.. टार्गेट कराल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही.. शिंदेंची बदनामी सहन करणार नाही असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय.. दरम्यान यानंतर प्रताप सरनाईक
आणि नरेश म्हस्के यांना पूर्णेकरांच्या पत्नीनं उत्तर दिलंय..ठोशाला ठोशा अशी धमकीची भाषा कशासाठी वापरताय असा सवाल पूर्णेकरांच्या पत्नीनं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईकांना केलाय..
'महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या'. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्या विजयावर काँग्रेसचे राज्य प्रभारी सिरिवेला प्रसाद यांनी आनंद व्यक्त केला. या विजयाबद्दल त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व, नागपूर पदवीधर मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचे अभिनंदन केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे एकाच मंचावर येणार…महाराष्ट्राच्या हस्तरेषा पुस्तक प्रकाशनासाठी एकत्र येणार…
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण... आदित्य ठाकरे-संजय राऊत पदाधिका-यांसह ठाण्यात आंदोलन करणार, तर शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, शिवसेनेचा इशारा.
पुणे, संभाजीनगर पदवीधरमध्ये राष्ट्रवादी SPचे उमेदवार विजयी…तर नागपुरात भाजपच्या सुधाकर कोहळेंना धोबीपछाड देत काँग्रेसच्या अभिजीत वंजारीची सरशी…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 29 october 2026 : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला. त्याचबरोबर, शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी असून एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करतील. पूर्णेकरांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला असून आज ठाण्यात दोन्ही शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, संजय राऊत, आदित्य ठाकरे सहभागी होणार, शिंदेंचे पदाधिकारी आनंद आश्रमात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.