SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणः ठाण्यातील आजचं सर्वपक्षीय आंदोलन मागे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 29 october 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 29, 2026, 09:33 AM IST | Updated: Oct 29, 2026, 12:14 PM IST
Image Credit: Breaking news live updates
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 29 october 2026 : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला. त्याचबरोबर, शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी असून एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करतील. पूर्णेकरांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला असून आज ठाण्यात दोन्ही शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, संजय राऊत, आदित्य ठाकरे सहभागी होणार, शिंदेंचे पदाधिकारी आनंद आश्रमात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

29 Oct 2026, 12:14 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: मालेगावात भीषण अपघात, पती -पत्नीसह 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

 

मालेगाव तालुक्यातील मालेगाव कुसुंबा रोडवर टिंगरि वणपट फाट्याजवळ पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील धुळे चिंचगाव येथील राहणारे राजेद्र नाना माने वय वर्ष 45 , भठा बाई राजेंद्र माने - वय 18 व बालाबाई राजेंद्र माने - वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला. मयत तिघांना शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात आणले असून घटनेची तीव्रता बघता मंत्री दादा भुसे यांनी तिथे भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. काही कार्यक्रमा निमित्त ते नांदगाव येथे गेल्याचे समजते तिकडून परतत असताना हा अपघात झाला. मात्र आई वडील आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

29 Oct 2026, 12:11 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: 'देशातील तरुणांनी भाजपचा माज उतरवला'

अंजली दमानिया यांचा भाजपवर हल्लाबोल

पदवीधर निकालावरून दमानियांनी डिवचलं

29 Oct 2026, 12:11 PM

Maharashtra Breaking News Today LIVE: 'महायुती म्हणून आत्मचिंतन करणार का?'

 

पदवीधर, शिक्षक निकालानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलीय.. महायुती म्हणून आत्मचिंतन करणार का असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. पाच जागा जिंकण्याची क्षमता असताना 2 वर का थांबलो असं उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटलंय...

29 Oct 2026, 11:12 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, ठाण्यातील आजचं सर्वपक्षीय आंदोलन मागे

 

ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी SP पक्ष करणार होते आंदोलन.. आंदोलनात आदित्य ठाकरे राज ठाकरे अनिल परब जितेंद्र आव्हाड केदार दिघे राजन विचारे राहणार होते उपस्थित. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर अखेर सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन मागे घेत.. ठाणे रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेणार आहेत...

29 Oct 2026, 11:10 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: गोकुळवर प्रशासक?

 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची अध्यक्षपद निवडीसाठी थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे.. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळच्या अटीतटीच्या निवडणुकीत सतेज पाटील समविचारी पॅनलने 25 पैकी 13 जागा मिळवीत गोकुळ मध्ये सत्तांतर घडवले. तर महायुतीकडे 12 संचालक आहेत... समविचारी पॅनलचे शशिकांत पाटील चुयेकर हे सहज अध्यक्ष होणार हे नक्की मानले जात होत. मात्र सहकार कायद्यानुसार अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 14 संचालकांचे कोरम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातच गोकुळचे महायुतीचे संचालक अद्याप गोव्यात आहेत.. त्यामुळे हे संचालक आजच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.. आजची सभा कोरम अभावी तहकूब होण्याची देखील शक्यता वर्तवली जातेय.. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय..

29 Oct 2026, 10:03 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार

 

माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार, पावसाळी सुट्टीनंतर माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत...

29 Oct 2026, 9:58 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना दिवाळी भेट

 

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना दिवाळी भेट.. महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ.. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय.. 1 जुलै 2026पासून वाढ लागू होणार...

29 Oct 2026, 9:57 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: ऊस दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी आक्रमक

 

ऊस दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी आक्रमक..सांगलीत ठिकठिकाणी स्वाभिमानीची आंदोलनं.. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले..

29 Oct 2026, 9:56 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाची आज निवड

 

गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाची आज निवड…समविचारीकडे कोरम पूर्ण करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने पेच वाढला…महायुतीचे संचालक उपस्थित राहणार का याकडे लक्ष…

29 Oct 2026, 9:44 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: 'ठोशाला ठोशा ही धमकी भाषा काय वापरताय?', पूर्णेकरांच्या पत्नीचा म्हस्के, सरनाईकांना सवाल

 

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री शिंदेंवर होणा-या आरोपांनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय.. टार्गेट कराल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही.. शिंदेंची बदनामी सहन करणार नाही असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय.. दरम्यान यानंतर प्रताप सरनाईक
आणि नरेश म्हस्के यांना पूर्णेकरांच्या पत्नीनं उत्तर दिलंय..ठोशाला ठोशा अशी धमकीची भाषा कशासाठी वापरताय असा सवाल पूर्णेकरांच्या पत्नीनं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईकांना केलाय.. 

29 Oct 2026, 9:42 AM

Maharashtra Breaking News Today LIVE:महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी सिरिवेला प्रसाद यांचा सरकारला टोला

 

'महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या'. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्या विजयावर काँग्रेसचे राज्य प्रभारी सिरिवेला प्रसाद यांनी आनंद व्यक्त केला. या विजयाबद्दल त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व, नागपूर पदवीधर मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचे अभिनंदन केले

29 Oct 2026, 9:41 AM

Maharashtra Breaking News Today LIVE:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे एकाच मंचावर येणार

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे एकाच मंचावर येणार…महाराष्ट्राच्या हस्तरेषा पुस्तक प्रकाशनासाठी एकत्र येणार…

29 Oct 2026, 9:40 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण

 

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण... आदित्य ठाकरे-संजय राऊत पदाधिका-यांसह ठाण्यात आंदोलन करणार, तर शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, शिवसेनेचा इशारा.

29 Oct 2026, 9:39 AM

Maharashtra Breaking News Today LIVE: पदवीधरांचा महायुतीला धक्का

पुणे, संभाजीनगर पदवीधरमध्ये राष्ट्रवादी SPचे उमेदवार विजयी…तर नागपुरात भाजपच्या सुधाकर कोहळेंना धोबीपछाड देत काँग्रेसच्या अभिजीत वंजारीची सरशी…

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES