SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 07 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 07 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 07, 2026, 07:26 AM IST | Updated: Nov 07, 2026, 10:16 AM IST
Image Credit: Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 07 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Join

Maharashtra News LIVE 07 November 2026 : महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मुंबई-पुणे ब्रेकिंग न्यूज, राजकीय बातम्या, हवामान अपडेट्स आणि ताज्या बातम्या वाचा. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, राजकारण, हवामान आणि स्थानिक बातम्या live on zee 24 Taas marathi news.

07 Nov 2026, 10:16 AM

जय पवारांचा शरद पवारांना फोन.

जय पवारांचा शरद पवारांना फोन...शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस...पवारांच्या प्रकृतीची फोनवरुन घेतली माहिती...पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

07 Nov 2026, 9:40 AM

अभिनेत्यांना धमक्या देणारा इंजिनिअर जेरबंद

अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अभिनेत्यांना धमकी देणा-या इंजिनिअरला अटक करण्यात आलीये.. वैभव मिश्रा असं या इंजिनिअरचं नाव असून त्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आलीये.. तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्रभावाखाली असल्याचे तपासात समोर आलंय.. आरोपी वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचे व्हिडिओ वारंवार पाहत असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीये.. त्यानं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे भासवून अभिनेत्यांना धमकी दिली...मोबाईल नंबर ऑनलाइन मिळाल्यास ऑडिओ मेसेजद्वारे, तर काहींना इन्स्टाग्रामवरून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.. इतकच नाही तर त्यानं मोबाईलमधील जुना डेटा आणि रेकॉर्ड डिलीट केल्याचा संशयही पोलिसांना आहे... त्याला कोर्टानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये.. धमक्यांमधून पैसे उकळण्याचा त्याचा उद्देश होता की लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंचा प्रभाव होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

07 Nov 2026, 9:15 AM

दिल्लीतील हवा 'अत्यंत खराब' श्रेणीत

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक 400च्या वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन ग्रॅप-3 निर्बंध लागू केले आहेत...मेट्रो आणि बस सेवांच्या फेऱ्या वाढवल्या जातील...जास्तीत जास्त लोकांनी खासगी गाड्यांच्या ऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन..चारचाकीबाबत नियम कठोर करण्यात आलेत..

07 Nov 2026, 8:41 AM

ठाकुर्लीतून एका नक्षलवाद्याला अटक, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

ठाकुर्ली परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलीये.. संजय सरोज यादव उर्फ संजय गोदराई उर्फ बुधराम असं या नक्षलवाद्याचं नाव आहे.. हा नक्षलवादी झारखंडच्या जंगलातील रहिवासी आहे. तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहात होता अशी माहिती समोर आलीये.. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं...या नक्षलवाद्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.. तो ठाकुर्लीमध्ये काय करत होता याचा तपास पोलीस करत आहेत..

07 Nov 2026, 8:18 AM

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचं दिवाळी गिफ्ट

मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ..
त्यामुळे दिवाळीत सलग पाच दिवस शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत...सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी दुपारी यासंदर्भातला शासन निर्णय प्रसिद्ध केला... 
त्यात ९ नोव्हेंबर रोजी तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ७ नोव्हेंबर रोजीसाप्ताहिक सुट्टी, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आणि बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबिजेनिमित्त सुट्टी आहे...सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी कार्यालये सुरू राहणार होती. मुंबईत शासकीय कर्मचारी दिवाळी सणाला गावी जातात. सोमवारी एका दिवसासाठी त्यांना आपल्या जिल्ह्यातून मुंबईला येणे अडचणीचे होते..
.

07 Nov 2026, 7:38 AM

मुख्यमंत्री शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

मुख्यमंत्री शेतक-यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत...फडणवीस आज नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहेत.... मुख्यमंत्री नागपूरहून लोहारी सावंग्याकडे संध्याकाळी रवाना होतील रात्री तेथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतीविषयक समस्या, सिंचन आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत... रात्री त्याच गावात मुक्काम देखील करणार आहे... त्यानंतर रविवारी सकाळी नरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक होईल... त्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे शेतीची पाहणी आणि जलसंधारण कामांचा आढावा घेतील...

07 Nov 2026, 7:28 AM

(CBSE बोर्डच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे... दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षा 16 फेब्रुवारी 2027पासून सुरू होणार आहेत... दहावीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 पर्यांत तर बारावीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2027 पर्यंत असेल... या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकूण 46.3 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत... यामध्ये इयत्ता 10वीचे सुमारे 26.5 लाख, तर इयत्ता 12वीचे 19.8 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.

ZEENEWS TRENDING STORIES