SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

LIVE UPDATES : मुंबईतील गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणावर परिणाम?

Maharashtra Breaking News Today LIVE : सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात 3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झालीय.अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची आज घोषणा होणार आहे. राज्यासह देशभरातील घडामोडी जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 24, 2026, 17:59 IST | Updated: Nov 24, 2026, 18:30 IST
Image Credit: लाईव्ह ब्लॉग 24 नोव्हेंबर 2026
Join

Maharashtra Breaking News Today LIVE : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त,आता दरवर्षी पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही. शासनाने शासन निर्णय जाहीर केलाय.पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून याप्रसंगी रवींद्र धनगेकरांच्या पोस्टवर चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले आहे.

24 Nov 2026 18:30 IST

बोईसर येथे बाईकचा भीषण अपघात, तिघे दगावले


बोईसर येथे बाईकचा भीषण अपघात झाला. बोईसर नवापूर रोडवर बाईक आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. बोईसर जवळील पाम टेंभी गावाच्या हद्दीत अपघात झाला. अपघातात बाईक वरील तिघांचा जागीच मृत्यू. भरधाव बाईकची ट्रकला मागून जोरदार धडक दिली.  अपघातात मोहित शर्मा, रवी गुप्ता, आणि नयन महातो अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. बोईसर च्या गणेश नगर परिसरातील हे तिन्ही विद्यार्थी संध्याकाळचा सुमारास नांदगाव आलेवाडी बीचवर बाईकवरून जात असताना अपघात.

24 Nov 2026 18:27 IST

शरद पवार निवृत्ती घेणार? कोणी केलाय दावा?

 

ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करावी व त्यांच्या पक्षाने भाजपप्रणित 'एनडीए'त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिशरद पवार यांचा पक्ष 'एनडीए'सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त 'लोकमत'ने रविवारच्या अंकात दिल्यानंतर एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राने सोमवारी हेच वृत्त दिले आणि वृत्तवाहिन्यांनीही तशा बातम्या दिल्याने या संबंधीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात अधिकच उधाण आले असताना 
आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.'एनडीए' सोबत गेल्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार शरद पवार यांनी सोडला.

24 Nov 2026 18:18 IST

पेपर फोडणाऱ्यांना 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास?

 

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड; १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस करण्यात आलीय. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल सादर झाला. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ,संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस आहे.किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आलीय.

24 Nov 2026 18:16 IST

सोन्याच्या दरात दोनच दिवसात 3 हजार 300 रुपयांची वाढ

सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात  3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झालीय.जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 30 हजार 600 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 61हजार700 रुपयांवर गेलीय.

24 Nov 2026 18:15 IST

सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात वाढ


सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात  3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झालीय.जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 30 हजार 600 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 61हजार700 रुपयांवर गेलीय.

24 Nov 2026 18:10 IST

मुंबईतील गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणावर परिणाम?


पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. हे काम गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. या २४ तासांच्या कालावधीत ‘जी’ उत्तर, ‘के’ दक्षिण, ‘के’ उत्तर, ‘एच’ पूर्व व ‘एस’ विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच ‘के’ दक्षिण, ‘एस’ व ‘एन’ या विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

24 Nov 2026 18:04 IST

बाबासाहेबांवरील पृष्पवृष्टीसाठी परवानगीची आवश्यकता नाही, शासन निर्णय जाहीर

 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येते. मात्र दरवर्षी ही पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. पण ही कायमस्वरूपी करण्यात यावी आणि तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी मागणी चैत्याभूमी स्मारक समितीने मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने मुंबईचे जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला होता. आज अखेर शासनाने शासन निर्णय  जाहीर केलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महपरिनिर्वाण दिनानिमित्त,आता दरवर्षी पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही.    
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES