SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: शरद पवारांना डिस्चार्ज

मुंबई, महाराष्ट्रासहीत देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 04, 2026, 10:02 AM IST | Updated: Nov 04, 2026, 12:58 PM IST
Image Credit: ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Join

महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींपासून ते देशातील राजकीय क्षेत्रातील हलचालींपर्यंत आणि गावगल्लीतील अपडेट्सपासून ते अंतरराष्ट्रीय बातम्यांपर्यंत सारं काही एकच ठिकाणी... दिवसभरातील ताज्या घडामोडींच्या ए टू झेड अपडेट्स तुम्ही या पेजवर पाहू शकता, ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

04 Nov 2026, 12:42 PM

रितू तावडे आज गुजरात दौऱ्यावर

मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे या आज बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी गांधीनगर (गुजरात) दौऱ्यावर गेल्या आहेत.  गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची आज दुपारी साडेचार वाजता गुजरात मुख्यमंत्री कार्यालय, स्वर्णिम संकुल-१, गांधीनगर येथे महापौर श्रीमती रितू तावडे ह्या भेट घेणार आहेत. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात, गुजरात मधील जुनागढच्या साकरबाग प्राणिसंग्रहालयातून दोन जोड्या आशियाई सिंह (2 नर, 2 मादी) आणण्याबाबत दोन्ही राज्यांतील देवाणघेवाण प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळावी, यासाठी ही भेट नियोजित आहे.

04 Nov 2026, 12:42 PM

मतदारयादीत नाव नसल्यास 'फॉर्म 6 'चा पर्याय

नवी दिल्ली 'एसआयआर' नंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीत ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत किंवा समाविष्ट नाहीत, असे पूर्वी नोंदणीकृत असलेले मतदार पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी 'फॉर्म 6' सादर करू शकतात, असे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले. 'एसआयआर' नंतर प्रारूप यादीत नाव नसलेले अनेक मतदार 'फॉर्म 6' भरण्यास कचरत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. या अर्जामध्ये मतदार म्हणून पहिल्यांदाच नाव समाविष्ट करत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दद्यावे लागते. पूर्वीच मतदार म्हणून नोंदणी झालेली असताना देणे पुन्हा असे प्रतिज्ञापत्र हे खोटे प्रतिज्ञापत्र ठरू शकते आणि त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1950 च्या कलम 31 अंतर्गत आपल्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, अशी भीती या मतदारांच्या मनात होती. मतदारांमधील हा संभ्रम दूर करताना निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदारयाद्यांतून नाव वगळण्यात आलेले मतदार नाव समाविष्ट करण्यासाठी 'फॉर्म 6' सादर करू शकतात.

04 Nov 2026, 11:13 AM

इस्रायलची 4 अब्ज डॉलरची मदत बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला दरवर्षी दिली जाणारी 4 अब्ज डॉलरची (अंदाजे 3.79 लाख कोटी रुपये) मदत 2027 पासून बंद करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मदत बंद झाली तरी अमेरिकेकद्वन इस्रायलला शस्त्रास्त्रांची विक्री सुरू राहणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीच हा प्रस्ताव मांडल्याचा दावा ट्रम्प यांनी केला, फॉक्स न्यूजशी दूरध्वनीवरून बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली. इस्रायलला आता अमेरिकेच्या आर्थिक मदतीची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेने दरवर्षी 4 अब्ज डॉलर खर्च करणे आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

04 Nov 2026, 11:13 AM

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सह्याद्रीवर दाखल झाले आहेत.

04 Nov 2026, 10:23 AM

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल

- भ्रष्टाचारात नाशिकचा सलग दुसऱ्या वर्षीही डंका! 
- लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल...
- २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तब्बल १२१ सापळा प्रकरणांची नोंद.. 
- १९६ लाचखोरांना लाच घेताना रंगेहात पकडलं...
- पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईलाही टाकलं मागे... 
- मात्र, कारवाईच्या आकडेवारीमागचं धक्कादायक वास्तव समोर 
तब्बल ९६ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित...
- केवळ १५ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल...
- लाचखोरांना पकडण्यात नाशिक आघाडीवर, मात्र दोषसिद्धीचं काय? 
- कारवाईचा धडाका जोरात, पण तपासाचा वेग मंदावला!

04 Nov 2026, 10:23 AM

शरद पवारांना डिस्चार्ज

शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

04 Nov 2026, 10:23 AM

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावालाला तुरुंगात वाटतेय भीती; तिहारमध्ये वाढवली सुरक्षा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. इतर कैद्यांकडून चेहऱ्यावर वार करण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा आफताबने न्यायालयात केला. या दाव्याची गंभीर दखल घेत दिल्ली न्यायालयाने सोमवारी तिहार कारागृह प्रशासनाला त्याच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.

04 Nov 2026, 10:18 AM

दिल्ली आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

कोणीही अनिश्चित काळासाठी जागेवर ताबा मिळवू शकत नाही”; दिल्ली आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि इतरांकडून एका याचिकेवर उत्तर मागवले आहे. व्यापारी संघटनांनी दाखल केलेल्या या याचिकेत सणासुदीच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेली निदर्शने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, यावर भर देतानाच न्यायालयाने म्हटलं की, कोणत्याही नियुक्त आंदोलन स्थळावर अनिश्चित काळासाठी ताबा मिळवला जाऊ शकत नाही.

04 Nov 2026, 10:17 AM

राम पूर्णेकरांच्या जीवाला धोका; मीनाक्षी शिंदेंनी मागितलं पोलीस संरक्षण

राम पूर्णेकरांच्या जीवाला धोका आहे. पूर्णेकर कुटुंबाला पोलीस संरक्षण वाढवून द्या, अशी मागणी मीनाक्षी शिंदेंनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. माझं आणि राजेंद्र शिंदेंचं नाव घेण्यासाठी राम पूर्णेकरांना प्रवृत्त केल्याचाही आरोपही मीनाक्षी शिंदेंनी केला आहे. "मी काही केलं नाही म्हणून सुरुवातीला राजीनामा दिला नव्हता. मात्र माझ्या नेत्यावर आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला," असं ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी म्हटलं आहे.

04 Nov 2026, 10:12 AM

दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश

दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत, मात्र अदयाप बीएमसीने व्हिडियो पोस्ट केला नाही. दिया मिर्झाच्या व्हिडीओवरील टीकेवरून मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. बीएमसीच्या पर्यावरणपूरक दिवाळी मोहिमेवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर मुंबई हायकोर्टानं तीव्र आक्षेप घेतला.

04 Nov 2026, 10:13 AM

शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकी आधी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक होणार, गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप नंतर बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमधील गेल्या काही दिवसांतील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या शिवसेनेच्या प्री-कॅबिनेट बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

04 Nov 2026, 10:05 AM

आज शिवसेना पक्ष- चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर  पार पडणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता न्यायालयात युक्तिवाद करतील. सुनावणी दुपारी 2 वाजता होणार आहे.

04 Nov 2026, 10:02 AM

शिंदेंसंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तक्रार

आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी तक्रार केली. एका माजी मंत्र्याने अर्थमंत्री पदाबाबत नेमके काय झाले, याबाबत बैठकीत स्पष्टीकरण मागितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी निवासस्थानी आमदरांची बैठक झाली या बैठकीत आमदारांना येणाऱ्या अडचणी आणि भावना व्यक्त करण्याची वरिष्ठ नेतृत्वाने सूचना दिली. आमदारांनी वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षाबाबत विचारणा करत म्हटले की, हे वाद खालीपर्यंत कळत नाहीत आणि पक्ष कमजोर होत आहे. सत्तेत असूनही कामे होत नसल्याची तक्रार करत एकनाथ शिंदे यांच्याकडून कामकाज होत नसल्याचे आमदारांनी सांगितले.

04 Nov 2026, 10:02 AM

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पक्षात एकटं पाडलं जातंय

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पक्षात एकटं पाडलं जातंय, असं गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. तर भुजबळ, मुश्रीफ सोडून सर्वांनी अजित पवार जिंवत असताना त्रास दिला असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी हा आरोप केलाय. तसेच भाजपदेखील पार्थ आणि जय या दोन भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES